Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; फरार गुंड तुषार हंबीर अखेर पोलिसांच्या ताब्यात

खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण तसेच पिस्तुलाच्या धाकाने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून फरार असलेल्या हडपसरमधील गुंडाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 01, 2026 | 03:13 PM
खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; फरार गुंड तुषार हंबीर अखेर पोलिसांच्या ताब्यात

खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; फरार गुंड तुषार हंबीर अखेर पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण केल्याचा आरोप
  • आठ महिन्यांपासून फरार असलेला तुषार हंबीर फुरसुंगीतून अटकेत
  • अपहरणावेळी पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी
पुणे : खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण तसेच पिस्तुलाच्या धाकाने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून फरार असलेल्या हडपसरमधील गुंडाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. तुषार नामदेव हंबीर (वय ४०, रा. गोंधळेनगर, श्री छत्रपती महाराज चौक, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, उपनिरीक्षक युवराज धोंडे, संतोष तोडकर, राजू मोमीन, अमोल शेडगे, चेतन पाटील, भारत मोहळ यांनी ही कामगिरी केली आहे.

 

तुषार हंबीर याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे, गर्दी, मारामारी, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुरंदर तालुक्यातील कापूरहोळ ते नारायणपूर रस्त्यावर ३ मार्च २०२६ रोजी दुपारी ही घटना घडली होती. याबाबत व्यावसायिकाने राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

व्यावसायिकाचे कापूरहोळ येथे मद्य विक्री दुकान आणि उपाहारगृह आहे. त्यांचा मुलगा दुपारी दुचाकीवरून उपाहारगृहातून घरी निघाला होता. त्यावेळी मोटारीतून आलेल्या पाच ते सहा जणांनी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण केले. याबाबतची माहिती व्यावसायिकाला मिळाली. त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी शिरवळपर्यंत कारचा पाठलाग केला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पुरंदर तालुक्यातील पिसुर्डी येथे व्यावसायिकाचा मुलाला सोडून देण्यात आल्याचे समजले.

पोलिसांनी व्यावसायिकाच्या मुलाची चौकशी केली, तेव्हा त्याने सांगितले की, कारमधून आलेल्या पाच ते सहा जणांनी अपहरण केले. कारमध्ये त्यांनी धमकावले. एकाने पिस्तुलाचा धाक दाखविला. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराने कोयता उगारून जिवे मारण्याची धमकी दिली. समोरून पोलिसांचे वाहन येत होते. अपहरण करणाऱ्या आरोपींनी शेतात नेले. मला रस्त्याकडेला सोडून देण्यात आले, असे त्याने सांगितले. पोलिसांनी कारचा पाठलाग केला. आरोपींची कार रस्त्याच्या कडेला उलटली. आरोपी कार तेथेच सोडून पसार झाले, अशीही माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा : पुणेरी मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार! ‘या’ तारखेपासून सकाळी 6 वाजता पहिली फेरी; जाणून घ्या तिकीटदर

पोलिसांनी तपास सुरू केला. व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण तुषार हंबीर आणि साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. कारवाईनंतर टोळीचा म्होरक्या हंबीर पसार झाला होता. तो हडपसरमधील फुरसुंगी भागात येणार असल्याची माहिती तपासात मिळाली. या ठिकाणी त्याला ताब्यात घेतले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण कोणी केले होते?

    Ans: हडपसरमधील गुंड तुषार नामदेव हंबीर आणि त्याच्या पाच ते सहा साथीदारांनी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण केले होते.

  • Que: अपहरणाची घटना कुठे आणि कधी घडली होती?

    Ans: ३ मार्च २०२६ रोजी पुरंदर तालुक्यातील कापूरहोळ ते नारायणपूर रस्त्यावर ही घटना घडली होती.

  • Que: आठ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला कुठून अटक करण्यात आली?

    Ans: पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने हडपसरमधील फुरसुंगी परिसरातून तुषार हंबीर याला ताब्यात घेतले. या प्रकरणात यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती.

Web Title: Pune rural police have arrested absconding gangster tushar hambir nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

लातूरमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्…
1

लातूरमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्…

चादरी विक्रेते बनून गावात फिरले, बँकेची रेकी केली अन्…; गावकऱ्यांच्या धाडसामुळे दरोड्याचा डाव फसला
2

चादरी विक्रेते बनून गावात फिरले, बँकेची रेकी केली अन्…; गावकऱ्यांच्या धाडसामुळे दरोड्याचा डाव फसला

आधी काळेवाडीत कोयत्याचा थरार, नंतर पिंपरीत व्यापाऱ्याला लुटले; एकाच रात्री दोन गंभीर घटना
3

आधी काळेवाडीत कोयत्याचा थरार, नंतर पिंपरीत व्यापाऱ्याला लुटले; एकाच रात्री दोन गंभीर घटना

धक्कादायक ! प्रियकराने दगा दिल्याने तरुणी नैराश्येत; गळफास घेऊन संपवले जीवन
4

धक्कादायक ! प्रियकराने दगा दिल्याने तरुणी नैराश्येत; गळफास घेऊन संपवले जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.