
Couple Murder
पानवडी येथे २५ ऑक्टोबर २०२६ रोजी मोहन बाबुराव धिवार (वय ८२-८३) आणि त्यांच्या पत्नी रत्नमाला मोहन धिवार (वय ७२) या वृद्ध दाम्पत्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या दुहेरी हत्याकांडांमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी मृत दाम्पत्याची मुलगी अश्विनी अमर खरात यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गणेश सुभाष धिवार (वय २७, रा. पानवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपासानुसार, जनावरे घरासमोरून नेण्याच्या कारणावरून आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी झालेल्या पूर्ववैनस्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे.
हेही वाचा: Pradeep Purnekar Murder Case: पतीची ७ वेळा चौकशी, आता थेट माजी महापौर! पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास ऐन वळणावर
तपासादरम्यान संशयित खराडी परिसरातून चारचाकी वाहनाने साताऱ्याच्या दिशेने जात असल्याचे तांत्रिक तपासातून स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी येरवडा, लक्ष्मीनगर, खराडी, कोंढवा, नवले ब्रिज आणि खेड शिवापूर टोलनाक्यामार्गे त्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली. राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव आणि त्यांच्या पथकाने खेड शिवापूर, नसरापूर पूल, कामथडी पूल, कापूरव्होळ आणि धांगवडी परिसरात नाकाबंदीचे नियोजन केले. नसरापूर–चेलाडी पुलावर संशयिताचे वाहन येताच सासवड पोलीस आणि राजगड पोलिसांनी संयुक्तरीत्या वाहनाला घेराव घातला. या कारवाईदरम्यान पोलीस कर्मचारी राहुल भडाळे यांनी INSAS रायफलच्या सहाय्याने संशयिताला शिताफिने नियंत्रणात आणले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित गणेश धिवारविरुद्ध यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. यामध्ये चंदननगर पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये दाखल असलेला अपहरण, लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो कायद्याशी संबंधित गंभीर गुन्हा, तसेच बंडगार्डन पोलीस ठाण्यात २०२३ मधील एका गुन्ह्याचा समावेश आहे. सध्या सासवड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, हत्येमागील नेमके कारण, वापरलेले हत्यार आणि इतर तांत्रिक बाबींचा शोध घेतला जात आहे.
Ans: २५ ऑक्टोबर २०२६ रोजी मोहन बाबुराव धिवार (८२-८३ वर्षे) आणि रत्नमाला मोहन धिवार (७२ वर्षे) या वृद्ध दाम्पत्याची हत्या झाली.
Ans: सासवड व राजगड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर-चेलाडी पुलावर नाकाबंदी करून संशयित गणेश धिवारला ताब्यात घेतले.
Ans: जनावरे घरासमोरून नेण्याच्या कारणावरून आणि गणेश विसर्जनाच्या दिवसातील पूर्ववादातून ही हत्या झाल्याचा आरोप आहे.