PUNE (फोटो सौजन्य- PINTEREST)
पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हंटल जात. त्याच माहेरघरात अनेक गुन्ह्यांची नोंद होत आहे. सतत हत्या बलात्काराच्या घटना घडत आहे. आता पुण्यातील नामांकित महाविद्यालयात सिनिअर्सकडून रॅगिंग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासाठी थेट मंत्रालय स्तरावर विध्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केली आहे.
प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीचे अपहरण; चाकूचा धाक दाखवला, कँटिनमध्ये नेलं अन्…
पुण्यातील बी.जे. मेडीकल वैद्यकिय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार समोर आला आहे. एका नामांकित शिक्षण संस्थेचे संस्थापक असलेल्या व्यतीच्या नातवावर रॅगिंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्याच्यावर रॅगिंग झाली तो मुलगा बीजे मेडीकल वैद्यकीय महाविद्यालयात एम एस होण्यासाठी आर्थोपेडीक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. याच डीपार्टमेंटमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी त्याच्यावर रॅगींग केल्याचा आरोप आहे. याबाबतची तक्रार देऊन देखील त्या तक्रारीची पुरेशी दखल घेतली नसल्याचं विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
पुरेशी दखल न घेतल्याचा आरोप..
मिळालेल्या माहिती नुसार, मुलगा पहिल्या वर्षात शिकतो. त्या मुलाला त्याचे दोन सिनिअर्स डिपार्टमेंटमध्ये डोक्यावरून कधी गार पाणी ओतून घ्याल लावायचे, तर कधी गरम पाणी ओतून घ्याला लावत असे. या मुलाने ही बाब आधी आर्थोपीडीक डीपार्टमेंटचे विभागप्रमुख डॉक्टर गीरीष बारटक्के यांना सांगितली होती. मात्र त्यांनी पुरेशी दाखल घेतली नाही. त्यानंतर त्याने ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांना देखील ही बाब सांगण्यात आली. मात्र त्यांनीही पुरेशी दाखल न घेतल्याने मुंबईला वैधकीय शिक्षण विभागाकडे दाद मागण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली.
माहिती बाहेर येवू नये म्हणून…
पुण्यातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मात्र माहिती बाहेर येवू नये यासाठी महाविद्यालयाकडून खबरदारी घेतली जात असल्याची चर्चा आहे. थेट मंत्रालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केली असल्याने प्रकरणाची माहिती बाहेर आल्याची चर्चा आहे. नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर दोन विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी म्हणजे अभ्यासक्रमाच्या एका टर्मसाठी निलंबीत करण्यात आलं आहे.
बी जे महाविद्यालयातील ऑर्थोपेडिक्स विभागातील पहिल्या वर्षाला शिकत असणाऱ्या निवासी डॉक्टरने वरिष्ठ निवासी डॉक्टरांविरोधात रॅगिंग केल्याप्रकरणी तक्रार केली होती. अनेक दिवस या निवासी विध्यार्थ्याला त्रास होत होता अशी माहिती समोर आली आहे. तक्रारदार विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी याची तक्रार थेट प्रशासनाने मंगळवारी (२९ एप्रिल ) अँटी रॅगिंग समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या प्रकरणाचा अहवाल तयार करण्यात आला असून. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पैसे दे, नाहीतर तुला…; सराईत गुन्हेगाराकडून व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी