पुणे: पुणे येथील पिंपरी चिंचवडयेथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मित्रांनीच एका व्यावसायिक मित्रावर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. यात ३७ वर्षीय नितीन शंकर गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील चऱ्होली अलंकापुराम चौकाजवळ ही घटना घडली आहे. ही हत्या का करण्यात आली, या मागचं कारण काय? चला जाणून घेऊयात?
काय घडलं नेमकं?
समोर आलेल्या माहितीनुसार, अलंकापुरम 90 फुटी रोडवर श्री साई रोड कॅरिअर इथे साडेपाच ते ६ वाजण्याच्या दरम्यान ही गोळीबाराची घटना घडली. या ठिकाणी काळ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीत बसलेले असताना नितीन शंकर गिलबिले यांच्यावर त्यांचेच मित्र अमित जीवन पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी गोळीबार केला. या गोळीबारात नितीन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हत्येचा कारण काय?
मृतक नितीन गिलबिले यांचे अमित पाठारे, आणि विक्रांत ठाकूर हे मित्र आहेत. हे तिघेही जमिनीच्या प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते. याच व्यवसायामधील व्यवहाराच्या वादातून हा गोळीबार केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गोळीबारानंतर अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांचा शोध घेतला जात असून पोलीसांनी या घटनेबाबत अधिक तपास सुरू केला आहे.
आंदेकर टोळीचा नामोनिशान मिटवायला सुरुवात! कडक बंदोबस्तात कारवाई
पुण्यातील बंडू आंदेकर टोळीवर पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे. स्वतःच्या नातवाच्या हत्या प्रकरणात संपूर्ण आंदेकर टोळी आत आहे. मात्र आंदेकर टोळीने दमदाटी करून जे काही अनधिकृत बांधकाम केल होत त्यावर आता कारवाईला सुरुवात झाली आहे. आंदेकर टोळीने नाना पेठेत वारकरी भवन बांधल होत. त्यावर आज पालिकेने तोडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. बंडू आंदेकरची टोळी ही दमदाटी करून हफ्ता वसूल करायचे. त्या भागात असणाऱ्या मच्छी मार्किट मधून माया जमा करत असायचा. मात्र आता आंदेकर टोळीचा पुरता बंदोबस्त करायला सुरुवात केली आहे.
Ans: पुणे
Ans: नितीन
Ans: दोन






