Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : ठाणे जिल्ह्यातील हातभट्टीवर धाडसत्र; ९.१६ लाखाचा मुद्देमाल जप्त

अलिकडेच झालेल्या पावसाचा गैरफायदा घेत ठाण्यातील खाडी किनारी पुन्हा नव्याने सुरु झालेल्या गावठी दारु निर्मितीच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे पथकांनी धडक कारवाई केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 17, 2025 | 06:32 PM
ठाणे जिल्ह्यातील हातभट्टीवर धाडसत्र; ९.१६ लाखाचा मुद्देमाल जप्त (फोटो सौजन्य-X)

ठाणे जिल्ह्यातील हातभट्टीवर धाडसत्र; ९.१६ लाखाचा मुद्देमाल जप्त (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील अंजूरगाव व आलीमघर खाडीमध्ये अवैध हातभट्टी केंद्र नष्ट करण्यासाठी हातभट्टी केंद्रावर धाडसत्र राबवून धडक कारवाई करण्यात आली. पावसाचा फायदा घेत या खाडीत अवैध हातभट्टी मद्य निर्मितीत वाढ झाली होती. त्याअनुषंगाने उत्पादन शुल्कच्या प्रशिक्षित जवानांनी बोटीने जावून सर्व हातभट्टी मद्य निर्मिती ठिकाणे १५ जुलै रोजी नष्ट केली. या कारवाईत एकूण ९ लाख १६ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायदा १९४९ अंतर्गत ०३ गुन्हे नोंद करण्यात आले.

कराडमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार; मद्यधुंद कारचालकांने दोन दुचाकींना उडवले

ठाणे जिल्ह्यामध्ये सामूहिक मोहिम राबवून केलेल्या कारवाईत २०० लिटर क्षमतेचे १७८ ड्रम व १००० ली. क्षमतेचे ३ बॉयलर त्यामध्ये ३३ हजार ६०० लीटर रसायन व ३५ ली. गावठी दारु, इतर हातभट्टी साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी काही मुद्देमाल नाशवंत असल्याने तो जागीच नष्ट करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ राजेंद्र देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये उप अधीक्षक वैभव वैद्य, दुय्यम निरीक्षक एच. एम. देवकाते, सहा. दुय्यम निरीक्षक रणजीत आडे, तसेच जवान संदिप धुमाळ, अविनाश जाधव, रामचंद्र पाटील, राजु राठोड, भाऊसाहेब कराड, नारायण जानकर, विनोद अहिरे, प्रविण धवणे, रुपेश खेमनार यांचा सहभाग होता.

हातभट्टी दारु, अवैध मद्य निर्मिती केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग, ठाणे विभागाची धाडसत्र मोहिम राबविण्यात येत आहे. नागरिकांना अशा अवैध धंदयांबाबत तक्रार करायची असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ वर संपर्क साधू शकतात, असे आवाहनही राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

दरम्यान आतापर्यंत या हातभट्टी दारु निर्मिती केंद्रांवरील धाडीत रसायनाने भरलेले सुमारे १८० ड्रम्स उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईमध्ये १२ बेवारस तर एक वारसदार असलेल्यावर गुन्हे दाखल झाले असून यामध्ये ३९ हजार ५०० लीटर रसायन, तयार दारु आणि इतर सामुग्री असा १३ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या कारवाईसाठी उत्पादन शुल्कच्या पथकांनी बोटिमधून जाऊन खाडीतील हातभट्टी निर्मिती ठिकाणे उद्ध्वस्त केली.

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले

Web Title: Raids on the illicit liquor distilleries in thane district seizure of goods worth 916 lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 06:32 PM

Topics:  

  • crime
  • police
  • thane

संबंधित बातम्या

Chandrapur Accident: वाहनाच्या धडकेत सलून चालकाचा मृत्यू, कार चालकाचे कुटुंब जखमी; धानोरा पॉईंटवरील घटना
1

Chandrapur Accident: वाहनाच्या धडकेत सलून चालकाचा मृत्यू, कार चालकाचे कुटुंब जखमी; धानोरा पॉईंटवरील घटना

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! महामार्गावर शेकोटी करत उभ्या तिघांना इनोव्हा कारने चिरडले; तिघांचा मृत्यू
2

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! महामार्गावर शेकोटी करत उभ्या तिघांना इनोव्हा कारने चिरडले; तिघांचा मृत्यू

Solapur Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून सोलापूर जिल्ह्यात तरुणाचा निर्घृण खून; आठवडा बाजारातच कोयत्याने हल्ला
3

Solapur Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून सोलापूर जिल्ह्यात तरुणाचा निर्घृण खून; आठवडा बाजारातच कोयत्याने हल्ला

Akola Crime: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रक्तपात! अकोल्यात तंबाखू न दिल्याच्या रागातून व्यक्तीची हत्या
4

Akola Crime: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रक्तपात! अकोल्यात तंबाखू न दिल्याच्या रागातून व्यक्तीची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.