
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलमधील 16 विद्यार्थिनी शिक्षण सहलीसाठी रायगडावर जात होत्या. खासगी मिनिबसने त्या महाड शहराच्या हद्दीत प्रवेश करताच चालकाचे अचानक बसवरील नियंत्रण सुटले आणि मिनीबस रस्त्याच्या कडेला पलटली. स्थानिक नागरिकांनी अपघात होताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.
एका विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर
जखमी झालेल्या विद्यार्थिनीला व शिक्षक आणि चालकाला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यांनतर एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत तिला पुढील उपचारांसाठी महाड उपजिल्हा रुग्णालयात हलवले. महाड तालुका पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, पोलिसांनी अपघाताचे प्राथमिक कारण अंधार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पहाटेच्या वेळी परिसरात कमी प्रकाश असल्याने चालकाचा मिनीबसवरील ताबा सुटल्याचे तपासातून पुढे येत आहे.
या अपघातात अक्षरा ढोकळे (वय 16), आदिती खेरमोडे (16), आदिती खाडे (16), सिद्धी ढोकळे (16) या विद्यार्थिनी तसेच शिक्षक जगन्नाथ येवले (45) आणि चालक योगेश जाधव (35) हे जखमी झाले आहे. सहलीला जातांना ही दुर्घटना घडल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
नेरळमध्ये गोळीबार! 15 गुन्ह्यांमध्ये वाँटेड आरोपीने सलग दोन गोळ्या झाडल्या; सचिन भवर थोडक्यात बचावले
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ येथे गोळीबाराची धक्कादायक घटना उघड झाली आहे. धुळे शहरातील १५ गंभीर गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेला आरोपी अविनाश जगनाथ मारके याने मोटारसायकलवरून येत सचिन भवर या व्यक्तीवर गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Gondia Crime: धक्कादायक! अल्पवयीन मातेनेच एक दिवसाच्या अर्भकाला फेकलं विहिरीत; गोंदियातील घटना
Ans: महाड तालुक्यातील नांदगाव बुद्रूक परिसरात पहाटे मिनीबस पलटली.
Ans: चार विद्यार्थिनी, एक शिक्षक आणि बसचालक जखमी झाले असून एक विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर आहे.
Ans: पहाटे अंधार आणि कमी प्रकाशामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.