गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीनेच तिच्या बाळाला जन्म देताच विहिरीत फेकल्याचे समोर आले आहे. ही घटना एकोडी गावातील आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गंगाझरी पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन मातेला ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं?
गोंदिया जिल्ह्यातील एकोडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागील भागात ढिवरटोली येथील रहिवासी राजेंद्र ठाकरे हे घरातील विहिरीत पाणी भरण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना एका अर्भकाचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला. या घटनेची माहिती शेजारील लोकांना देण्यात आली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांना माहिती देण्यात आली.
गंगाझरी पोलिस आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात केली. तपासात धक्कादायक माहिती समोर आली. प्रेमप्रसंगातून गर्भधारणा झालेल्या एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म देताच विहिरीत फेकल्याचे समोर आले. या प्रकरणी गंगाझरी पोलीस ठाण्यात कलम 103 (1), 12, 238 भान्यासं अतंर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास गंगाझरी पोलीस करीत आहेत.
वडिलांसोबत शेतात गेली आणि काळाने घात केला! बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षीय चिमुलीचा मृत्यू झाला आहे. रुची देवानंद पारधी (वय 9), रा. इंदोरा निमगाव असे मृत चिमुकलीचे नाव आहे. रुची ही आपल्या वडिलांसोबत शेतात गेली होती. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तिला गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री तिचा मृत्यू झाला. ही घटना गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव येथे घडली. या घटनेने गावात भीतीचे वातावरण आहे..
काय घडलं नेमकं?
रुची ही तिच्या वडिलांसोबत शेतावर गेली होती. वडील तारांचे कुंपण लावण्याचे काम करीत होते, तर रुची ही शेतातील बांधात उभी होती. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला काही अंतरावर फरफटत नेले. रुचीचा रडण्याचा आवाज ऐकून तिचे वडील व आजूबाजूच्या शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केली. यानंतर बिबट्याने रुचीला सोडून देत जंगलाच्या दिशेने पळ काढला. बिबट्याच्या हल्ल्यात रुची गंभीर जखमी झाली. वडिलांनी आणि शेजाऱ्याच्या शेतकऱ्यांनी तिला त्वरित स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रात्री आठ वाजता तिचा मृत्यू झाला.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. मागील काही महिन्यांपासून गोंदिया जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढली आहे. या भागात वन्यप्राण्यांचा वाढता वावर रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
Ans: राजेंद्र ठाकरे नावाच्या नागरिकाला घरातील विहिरीत पाणी भरताना मृतदेह तरंगताना दिसला.
Ans: तपासात उघडकीस आलं की प्रेमप्रसंगातून गर्भधारणा झालेल्या अल्पवयीन कुमारी मातेनेच हा कृत्य केला.
Ans: गंगाझरी पोलिसांनी संबंधित मुलीला ताब्यात घेतलं असून विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.






