संतोष पेरणे: माथेरान येथे असलेल्या मध्य रेल्वे अधिकारी वर्ग विश्रामगृहात राहणाऱ्या कंत्राटी कामगारांमध्ये हाणामारी झाली आणि त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला.मात्र त्या कामगारांना रेल्वे विश्रामगृहात राहण्याची परवानगी दिली कोणी? मध्य रेल्वेवरील खोपोली ते विठ्ठलवाडी या भागाची वर्क्स विभागाची जबाबदारी असलेले अभियंता एस के यादव यांच्याकडून कंत्राटी कामगारांची नियुक्ती केल्याने या प्रकरणी यादव यांची चौकशी मध्य रेल्वेने करावी अशी मागणी केली आहे.
माथेरान येथील अधिकारी विश्रामगृहात कंत्राटी कामगार सुशांत सुनील गेजगे याचा मृत्यू झाला आहे.13 मार्च रोजी तेथे राहणाऱ्या दोन मित्रांनी सुशांत गेजगे याचा खून केला असून तेथे धारदार शस्त्र आली कुठून असा प्रश्न देखील पुढे आला आहे.रेल्वे कडून येथे कंत्राटी कामगारांची नियुक्ती वर्क्स विभागाचे अभियंता एस के यादव यांनी केली होती. त्यात त्या ठिकाणी असलेल्या चार कामगारांना कामावर ठेवताना रेल्वे प्रशासनाने करार केले नसल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे.त्यामुळे एस के यादव यांनी मनमानी करून तेथे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कंत्राटी कामगारांची नियुक्ती केल्याने खून प्रकरण वेगळ्या वळणावर गेले आहे.हा खून रात्री अकरा ते बारा या दरम्यान झाला मात्र त्याची उकल सकाळी सव्वा सहा वाजता झाली आहे.त्यामुळं दिनेश संतकुमार तिवारी आणि प्रेम किशोर जीगंदर किशोर पाल या दोघांनी धारदार शस्त्राने खून एका खोलीत टाकून स्वतः तेथील विश्रामगृह मधील दोन वेगवेगळ्या खोलीत झोप घेतली.
दिनेश तिवारी आणि प्रेमकिशीर पाल हे रेल्वे अधिकारी विश्रामगृहात सर्व खोल्यांचा वापर करीत असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे मध्य रेल्वे वरील अधिकारी वर्गासाठी असलेले विश्रामगृह कंत्राटी कामगारांसाठी दिले होते काय? याची चौकशी मध्य रेल्वे कडून झाली पाहिजे.माथेरान या पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणावर मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डाने अधिकारी विश्रांती साठी येत असतात.अशा उच्च दर्जाच्या विश्रामगृहात कंत्राटी कामगार विश्रांती घेत असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे त्या सर्व कंत्राटी कामगारांना माथेरान येथे आणणारे वर्क्स विभागाचे अभियंता एस के यादव यांची चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.
या खून प्रकरणी माथेरान पोलिस ठाण्यात ०२/२०२५ खाली गुन्हा दाखल झाला असून प्रेमकिशीर पाल आणि दिनेश तिवारी यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम १०३ (१),३५२,२१५(२),३(५) या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.जिल्हा पोलिस उप अधीक्षक डी डी टेले यांनी दिवसभर माथेरान मध्ये थांबून तपासाला गती देण्याचा प्रयत्न केला.अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना मध्यरात्री बारा वाजता कर्जत येथे नेण्यात आले असून या खून प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने करीत आहेत.मात्र कंत्राटी कामगार यांच्याकडे धारधार शस्त्र आली कुठून ? आणि त्याच्या माध्यमातून खून करण्यात आल्याने ही शस्त्रे त्यांच्याकडे आली हा प्रश्न अनुत्तरीत आहेत.