Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Raghuvanshi Case: सोनम रघुवंशीला पुन्हा तुरुंगात पाठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; 10 जुलैला पुढील सुनावणी

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मुख्य आरोपी सोनम रघुवंशीच्या जामिनाला स्थगिती देण्यास नकार दिला. मेघालय सरकारच्या याचिकेवर सुनावणी करत कोर्टाने सोनमला नोटीस बजावली असून पुढील सुनावणी 10 जुलै रोजी होणार आहे. अटक प्रक्रियेतील त्रुटी आणि खटल्याच्या संथ गतीवरही न्यायालयाने चिंता व्यक्त केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 04, 2026 | 08:25 AM
  • सर्वोच्च न्यायालयाने सोनम रघुवंशीच्या जामिनाला स्थगिती देण्यास नकार देत 10 जुलैला पुढील सुनावणी निश्चित केली.
  • अटक मेमोतील चुकीचे कलम नमूद केल्यामुळे सोनमला यापूर्वी सशर्त जामीन मिळाला होता.
  • खटल्यात 94 साक्षीदारांपैकी केवळ 4 जणांचीच साक्ष नोंदवली गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने संथ तपासाबद्दल चिंता व्यक्त केली.
मेघालय: मेघालयातील बहुचर्चित राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिच्या जामिनाला तात्पुरती स्थगिती देण्यास नकार दिला आहे. मेघालय सरकार आणि पोलिसांनी जामीन रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने सोनमला नोटीस बजावली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, अटकेदरम्यान झालेल्या पोलिसांच्या गंभीर प्रक्रियात्मक त्रुटी, खटल्याची संथ गती आणि जामिनाबाबतच्या कायदेशीर मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सविस्तर चर्चा झाली.

काय नेमकं प्रकरण?

मध्यप्रदेशच्या इंदूर येथे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांची ११ मे २०२५ रोजी सोनमसोबत लग्न झाला होता. दोघेही हनिमूनसाठी मेघालयातील चेरापुंझी येथे गेले होते. तेव्हा राजा अचानक गायब झाला. नंतर त्यांचा मृतदे एका खीळ दरीत आढळून आला. पोलिसांनी सखोल तपास केला असता सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि त्यांच्या साथीदार यांनी हत्या केल्याचा समोर आला. पोलिसांनीगुन्हा दाखल करत जून 2025 मध्ये सोनमला उत्तर प्रदेशातून अटक केली होती. या प्रकरणाचा खटला सुप्रीम कोर्टात सुरु आहे. आता सुप्रीम कोर्टाने सोनम रघुवंशीला जामीन दिली आहे.

Pune Crime : फरार गुंडाच्या बेकायदा हॉटेलवर चालवला बुलढोझर; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

मेघालय पोलिसांच्या गंभीर चुका

अटक करताना पोलिसांनी तयार केलेल्या ‘अरेस्ट मेमो’ आणि केस डायरीमध्ये हत्येसाठी असणारे नवीन कायद्यातील ‘बीएनएस’चे (BNS) कलम 103 लिहिण्याऐवजी चक्क ‘कलम 403’ लिहून ठेवले. विशेष म्हणजे, नवीन भारतीय न्याय संहितेत अशी कोणतीही कलम अस्तित्वात नाही. जुन्या आयपीसीमध्ये कलम 403 हे संपत्तीच्या अपहाराशी संबंधित होते. इतकेच नव्हे तर, पोलिसांनी आपल्या अधिकृत दस्तऐवजात सोनमचा उल्लेख ‘लष्करातील भगोडी’ असा केला होता. या गंभीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाने 28 एप्रिल 2026 रोजी सोनमला सशर्त जामीन मंजूर केला. आरोपीला अटकेचे योग्य कारण न सांगणे हे संविधानाच्या अनुच्छेद 22(1) चे थेट उल्लंघन आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. याविरोधात राज्य सरकारने हायकोर्टात (High Court) केलेली अपीलही 29 जून रोजी फेटाळली गेली होती.

सुप्रीम कोर्टाने काय म्हंटले?

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एम. सुंद्रेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठाने सुरुवातीला हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्याची तयारी दर्शवली होती. अरेस्ट मेमोमध्ये चुकीचे कलम लिहिणे हा जामिनाचा आधार असू शकत नाही, असे न्यायाधीशांचे मत होते. मात्र, सोनम आधीच जेलमधून बाहेर आली असून जामिनाच्या अटींनुसार शिलाँगमध्ये राहत आहे, ही माहिती समोर आल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय बदलला. आरोपी आधीच बाहेर असल्याने तिला पुन्हा जेलमध्ये पाठवणे कायदेशीर तत्त्वांच्या आधारे अनुचित ठरेल, असे कोर्टाने सांगितले.

पुणे केसचा उल्लेख

मेघालय सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हा अत्यंत धक्कादायक प्रकार असल्याचे सांगितले. एक महिला आपल्या पतीला हनीमूनच्या बहाण्याने नेते, तिथे तिघांच्या मदतीने त्याची हत्या करते आणि मृतदेह दरीत ढकलून फरार होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी पुणे येथील केतन अग्रवाल केसचा देखील दाखला दिला, जिथे एका मुलीने आपल्या होणाऱ्या पतीची केवळ तो टक्कल पडत चालला होता म्हणून हत्या केली होती. अशा गंभीर प्रकरणांमध्ये न्यायालयाने कठोर भूमिका घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली.

FDA Raid : भेसळीचा संशय; बीडमधील मिठाई उत्पादन केंद्रावर FDA ची कारवाई, गुन्हा दाखल

Web Title: Raja raghuvanshi case supreme court refuses to send sonam raghuvanshi back to jail next hearing on july 10

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • crime
  • Meghalay Crime News
  • Sonam Raghuvanshi

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.