नेमकं काय घडलं?
वैष्णवी ही वाळूजच्या एका महाविद्यालयात बारावीमध्ये शिकत होती. कॉलेज संपल्यानंतर शुक्रवारी दुपारी १२ वाजता ती घरी आली. यादरम्यान तिची आई शेतावर गेली तर तिचे वडील पानटपरीवर गेले होते. तर तिचा भाऊ शाळेत गेला होता. वैष्णवी ही घरात एकटीच होती. हीच संधी साधत त्यांच्याच गल्लीत राहत असलेला आरोपी नानासाहेब कडूबा मोरे(वय २७, रा. मुरमी)हा तिच्या घरी आला. त्याने साडेतीन वाजेच्या सुमारास धारदार शास्त्राने वैष्णवीची गळा चिरून हत्या केली. यानंतर तो पसार झाला.
वडील घरी आले तेव्हा वैष्णवी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात दिसली. त्यांनी तिच्या आईला फोन केला आणि सांगितले की वैष्णवीला रक्ताच्या उलट्या होत आहे. तिची आई घरात आली आणि नातेवाईक घरी आले. तेव्हा वैष्णवीला रक्ताच्या थारोळ्यात बघून आईचे भान हरपले. तिला तत्काळ बाहेर ओसरीत आणले असता तिचा मृत्यू झाला होता. तुरंत पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी पंचांनामा केला असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दुसरीकडे पोलिसांनी पथक तयार करून आरोपीच्या तपासाची सुरुवात केली.
वादामुळे केली हत्या
पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपीला जेरबंद केले. शनिवारी पहाटे पोलिसांनी आरोपी नानासाहेब कडूबा मोरे (वय २७, रा. मुरमी) याच शोध घेऊन अटक केले. एकाच गल्लीत राहणाऱ्या नानासाहेबासोबत तिचे मैत्रिपूर्णसंबंध होते. मात्र त्यांच्यात वाद झाला आणि हाच वाद विकृतीला नानासाहेबने शुक्रवारी निर्घुपणे वैष्णवीची हत्या केली.
हत्येनंतर तो रात्री नेमका शेजारचा नानासाहेब घरी नसल्याचे पोलिसांना समजले व त्याचा शोध सुरू केला. गंगापूरमधील बोलेगाव येथे लपून बसलेला असताना पहाटे ३.३० ला पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी नानासाहेबने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. त्याला न्यायालयासमोर हजर केले तेव्हा २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
Ans: गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे, शुक्रवारी दुपारी.
Ans: नानासाहेब कडूबा मोरे (वय 27, रा. मुरमी).
Ans: आरोपी बोलेगाव येथे लपून बसलेला असताना पहाटे 3.30 वाजता अटक करण्यात आली.






