Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दरोड्याच्या प्रयत्नातील परप्रांतीय टोळी जेरबंद; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

पुणे-नगर महामार्गालगत खंडाळे परिसरात दरोड्याच्या प्रयत्नात आलेल्या परप्रांतीय टोळीला जेरबंद करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 11, 2025 | 06:09 PM
दरोड्याच्या प्रयत्नातील परप्रांतीय टोळी जेरबंद; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

दरोड्याच्या प्रयत्नातील परप्रांतीय टोळी जेरबंद; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:
  • दरोड्याच्या प्रयत्नातील परप्रांतीय टोळी जेरबंद
  • रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
  • चौकशीत उडवाउडवीची दिली उत्तरे
शिक्रापूर : पुणे-नगर महामार्गालगत खंडाळे परिसरात दरोड्याच्या प्रयत्नात आलेल्या परप्रांतीय टोळीला जेरबंद करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. याबाबत पोलीस शिपाई संतोष लक्ष्मण अडसूळ (वय ४१ रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुरेशभाई प्रभूभाई धामेचा (वय ५१), जितेंद्रभाई दिनेश डाभी (वय ४७), मेहुल सुरेशभाई धामेचा (वय २३), भरतभाई देवजीभाई सोळंकी (वय ३२), उत्सव जितेंद्रभाई डाभी (वय १९), भरतभाई जीवराजभाई कोळी (वय ३३ सर्व रा. मोरबी २ इंदिरा नगर ता. बी डिव्हिजन जि. मोरबी गुजरात) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळे (ता. शिरुर) परिसरातील मातोश्री हॉटेल शेजारील एका बंद कंपनीमध्ये काही जण हातात दांडके व हत्यारे घेऊन शिरले असल्याबाबतच्या माहितीचा फोन पोलिसांना आला. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विलास आंबेकर, पांडुरंग साबळे, पोलीस शिपाई संतोष अडसूळ, उमेश कुतवळ यांनी खासगी वाहनाने त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. तेव्हा काहीजण एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून पळून गेल्याचे पोलिसांना समजले.

चौकशीत उडवाउडवीची दिली उत्तरे

पोलिस पुणे- नगर महमार्गावरुन जात असताना हॉटेल संग्राम समोर जि जे ३६ एल ५८९१ हि संशयीत कार पोलिसांना मिळून आली. दरम्यान पोलिसांनी पाहणी केली असता सहा जण दिसून आले. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशी केली असता त्या बंद पडलेल्या कंपनीतील काही कच्चा माल चोरीच्या हेतूने आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील सहा मोबाईल व कार जप्त केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहेत.

Web Title: Ranjangaon midc police have arrested a gang attempting to commit a robbery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 06:09 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

“बाबा मी जात आहे…”, सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वी व्हिडिओ केला शूट
1

“बाबा मी जात आहे…”, सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वी व्हिडिओ केला शूट

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…
2

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…

दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी, न्यायालयीन परिसरातील वाद चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
3

दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी, न्यायालयीन परिसरातील वाद चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?

वडगाव पोलिसांची बेकायदा धंद्यांवर धडक कारवाई; टाकवे बुद्रुक येथे गांजासह प्रतिबंधित पानमसाला जप्त
4

वडगाव पोलिसांची बेकायदा धंद्यांवर धडक कारवाई; टाकवे बुद्रुक येथे गांजासह प्रतिबंधित पानमसाला जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.