Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Accident: खेडशी येथे काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; चाकाखाली चिरडून महिलेचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा-रत्नागिरी मार्गावर खेडशी येथे भीषण अपघात झाला. भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील महिला रस्त्यावर फेकली गेली आणि डंपरच्या चाकाखाली चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. डंपर नियंत्रण सुटल्याने तो महामार्गावरून खाली कोसळला. अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 22, 2026 | 03:35 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • खेडशी येथे डंपर-दुचाकीच्या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू.
  • धडक दिल्यानंतर डंपर महामार्गावरून खाली कोसळला.
  • अपघातामुळे हातखंबा-रत्नागिरी मार्गावर वाहतूक कोंडी झाली.
रत्नागिरी: रत्नागिरी ते हातखंबा मार्गावरील खेडशी येथे सकाळच्या सुमारास एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडल्याचे समोर आले आहे. भरधाव येणाऱ्या डंपरने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीला धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटलेला डंपर महामार्गावरून थेट खाली कोसळला. आणि दुचाकीवरील महिला रस्त्यावर फेकली गेली. या भीषण अपघातात डंपरच्या चाकाखाली चिरडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

कसा झाला अपघात?

जाकादेवी येथील पांचाळ कुटुंब दुचाकीवरून प्रवास करत असतांना, खेडशी परिसरामध्ये पाठीमागून येणाऱ्या एका अनियंत्रित आणि वेगवान डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक बसताच दुचाकीवरील महिला रस्त्यावर फेकली गेली आणि डंपरच्या थेट खाली आली.
डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले त्यामुळे, डंपर रस्त्याच्या खाली कोसळत असताना ती महिलाही डंपरच्या खालीच दबली गेली, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

Andhra Pradesh Crime: हृदयविकाराचा बनाव अन् धक्कादायक सत्य उघड; पतीला आधी ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर….

वाहतूक विस्कळीत

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. मात्र, डंपर महामार्गावरून खाली कोसळल्याने आणि मोठी गर्दी जमल्याने हातखंबा-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.

आणखी एक अपघात

धक्कादायक म्हणजे जिथे डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला त्याच ठिकाणी काही वेळेपूर्वीच एका रिक्षाचाही अपघात झाला होता. त्यामुळे हा परिसर आज सकाळी अपघाताचे केंद्र बनला होता. या घटनेमुळे संपूर्ण जाकादेवी आणि खेडशी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आंबेगाव परिसरात प्रेमविवाह केलेल्या २० वर्षीय तरुणीने कथित हुंड्याच्या छळाला कंटाळून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी पती, सासू व नणंदेवर गुन्हा नोंदवला आहे. याबाबत मृत तरुणीच्या आईने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पती अजित दशरथ पवार (वय २५), सासू अनुसया दशरथ पवार (वय ५५) आणि नणंद अलका लहू जाधव (वय ३०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीने पत्नीला गुंगीचे औषध पाजून मित्राजवळ सोडले, नंतर हॉटेलमध्ये…; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे झाला?

    Ans: हा अपघात रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा ते रत्नागिरी मार्गावरील खेडशी येथे झाला.

  • Que: अपघातात कोणाचा मृत्यू झाला?

    Ans: जाकादेवी येथील पांचाळ कुटुंबातील एका महिलेचा या अपघातात मृत्यू झाला.

  • Que: अपघात कसा घडला?

    Ans: भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली, त्यानंतर डंपर नियंत्रण सुटून खाली कोसळला.

Web Title: Ratnagiri accident spine chilling accident at khedshi woman crushed to death under wheels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Andhra Pradesh Crime: हृदयविकाराचा बनाव अन् धक्कादायक सत्य उघड; पतीला आधी ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर….
1

Andhra Pradesh Crime: हृदयविकाराचा बनाव अन् धक्कादायक सत्य उघड; पतीला आधी ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर….

Kalyan Crime: 60 वर्षीय नराधमांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; घरभर रक्त आणि…
2

Kalyan Crime: 60 वर्षीय नराधमांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; घरभर रक्त आणि…

Malvan News: मालवणमध्ये पर्यटनाला आला, 8 फूट उंचीवरून स्वीमिंग पूलमध्ये उडी मारली आणि…; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
3

Malvan News: मालवणमध्ये पर्यटनाला आला, 8 फूट उंचीवरून स्वीमिंग पूलमध्ये उडी मारली आणि…; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Kalyan Crime: अल्पवयीन मुलीवर घरात घुसून दोन नराधमांनी केला लैंगिक अत्याचार, फाशीची शिक्षा देण्याची मागणी
4

Kalyan Crime: अल्पवयीन मुलीवर घरात घुसून दोन नराधमांनी केला लैंगिक अत्याचार, फाशीची शिक्षा देण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.