Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohini Paradhye Case : ‘रिल स्टार’ रोहिणी पाराध्ये प्रकरणी मोठा ट्विस्ट; पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

Rohini Paradhye death investigation : मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या रिल स्टार रोहिणी पारखे (वय 25) प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. तब्बल 23 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी तिचा पती निलेश पारध्ये याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 19, 2026 | 04:11 PM
'रिल स्टार'रोहिणी पाराध्ये प्रकरणी मोठा ट्विस्ट; पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

'रिल स्टार'रोहिणी पाराध्ये प्रकरणी मोठा ट्विस्ट; पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  • 23 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांची कारवाई
  • मारहाण आणि मानसिक त्रासामुळे रोहिणीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप
  • पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
पंढरपूर /शिवाजी हळणवर : ब्रह्मपुरी ता .मंगळवेढा येथील ग्रामपंचायत हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या रिल स्टार रोहिणी पारखे (वय 25) प्रकरणाला अखेर नवे वळण मिळाले असून, तब्बल 23 दिवसांच्या तपासानंतर तिचा पती निलेश पारध्ये याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास रोहिणीने हॉटेलमधील खोलीत गळफास घेऊन जीवन संपविले होते. या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले होते. आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी सीडीआरसह विविध अंगांनी तपास सुरू केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी पराध्ये यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी विविध आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून आत्महत्येमागील नेमकी कारणे आणि संबंधित आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

चाकणमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, तब्बल 83 किलो गांजा पकडला; स्कॉर्पिओही जप्त

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, निलेश पारध्ये हा मागील वर्षभरापासून रोहिणीला तिच्या इच्छेविरुद्ध हॉटेलमध्ये काम करण्यास भाग पाडत होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तसेच रोहिणीला शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे.या सततच्या छळाला कंटाळून रोहिणीने हॉटेलमधील राहत्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी रोहिणीचे वडील बाबू गिरजप्पा शिवशरण (रा. अर्धनारी ता.मंगळवेढा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलेश पारखे याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 108, 115(2), 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर हे करीत आहेत

नेमकं प्रकरण काय?

मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथं रोहिणी आणि तिचा नवरा निलेश पाराध्ये या जोडीने मिळून हॉटेल ग्रामपंचायत सुरू केलं होतं. ढवरा मटन थाळी ही त्यांची स्पेशालिटी होती. रोहिणी स्वत: हॉटेलचं किचनचं काम पाहत होती. याच हॉटेलमध्ये ती रिल्स बनवून गही अल्पावधीत लोकप्रिय झाली होती. पण, कुणाला ठावून असं काही घडेल. २६ मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रोहिणीने स्वतःच्या स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं. रोहिणीनं गळफास घेतल्याचं लक्षात आल्यावर तिला तातडीने मंगळवेढा इथं नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा शेवट झाला.

Crime News: धक्कादायक! बहिणीच्या कॉलेज प्रवेशासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला; आझाद कॉलेज परिसरातील थरार

Web Title: Reel star rohini parkhe suicide case husband nilesh pardhe booked for abetment mangalwedha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • crime
  • police

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar: अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण रॅकेटचा पर्दाफाश; ८ आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधार जेरबंद
1

Mira-Bhayandar: अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण रॅकेटचा पर्दाफाश; ८ आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधार जेरबंद

Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पुन्हा मोठ्या फेरबदलांची चर्चा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीची शक्यता
2

Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पुन्हा मोठ्या फेरबदलांची चर्चा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीची शक्यता

Thane News: भिवंडीत मद्य तस्करांना मोठा दणका; कंटेनरसह 1.90 कोटींचा विदेशी मद्यसाठा जप्त
3

Thane News: भिवंडीत मद्य तस्करांना मोठा दणका; कंटेनरसह 1.90 कोटींचा विदेशी मद्यसाठा जप्त

गे डेटिंग अ‍ॅप ठरलं सापळा! भेटायला बोलावलं, निर्जन खोलीत 7 जण वाट पाहत होते; पुढे जे घडलं ते धक्कादायक
4

गे डेटिंग अ‍ॅप ठरलं सापळा! भेटायला बोलावलं, निर्जन खोलीत 7 जण वाट पाहत होते; पुढे जे घडलं ते धक्कादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.