crime (फोटो सौजन्य: social media)
बीडच्या अंबाजोगाईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सेवानिवृत्त शिक्षिकेला व्हॉट्सॲप कॉलवरून ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचा प्रकार समोर आला आहे. सेवानिवृत्त शिक्षेकेला मनी लॉन्ड्रींग आणि अतिरेक्यांना फंडिंग केल्याचं सांगत तब्ब्ल ८३ लाख रुपयांना गंडवण्यात आलं आहे. चौकशीत सहकार्य करा सांगत फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी विश्वास नांगरे पाटील यांचे नाव घेत ही फसवणूक केली आहे.
अकोल्यात भीषण अपघात; कार वाघाडी नदीच्या पुलावरून कोसळली, तिघांचा मृत्यू, 1 गंभीर
ips चं नाव सांगत फोन केला
अंबाजोगाई येथील सेवानिवृत्त शिक्षेकेला मनी लॉन्ड्रीग आणि अतिरेक्यांना फंडिंग केल्याचे सांगत चौकशीला सहकार्य करा असे म्हंटले. व्हॉट्सॲप कॉल वरून तब्बल ८३ लाख रुपये हडपल्याचा प्रकार अंबाजोगाईत झाला आहे. तुमच्या आधार कार्ड वरून दुसरे सिम कार्ड घेतले असून त्याचा दुरुपयोग झाल्याचे देखील बनावट कॉलद्वारे सांगण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला या प्रकरणातुन सोडवू, यासाठी आम्हाला विश्वास नांगरे पाटील यांनी स्पेशल विनंती केल्याचा देखील निवृत्त शिक्षिकेला फोन केलेल्या भामट्यांनी सांगितले.
कर्ज काढलं आणि…
संजय पिसे नावाच्या व्यक्तीने व्हाट्सअप व्हिडिओ कॉल करून आधी या निवृत्त शिक्षिकेला मुंबई पोलिसांचे बनावट ऑफिस, झेंडे,लोगो दाखवून डिजिटल अरेस्ट केली. त्यांनतर भीती दाखवून २१ ते २९ मे या दरम्यान तब्ब्ल ८३ लाख १ हजार ८१६ रुपये उकळले आहे. विशेष बाब म्हणजे निवृत्त शिक्षकेने भीतीपोटी सोने प्लॉट गहाण ठेवून त्यावर कर्ज काढत ही रक्कम दिल्याचे सांगितले. ३० मे रोजी गुन्हेगारांनी व्हाट्सअप वरून ब्लॉक केल्यानंतर त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार शनिवारी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस करत आहेत.
फसवणूक झालेल्या शिक्षिकेने भीतीपोटी स्वतःचे सोनं आणि प्लॉट गहाण ठेवून कर्ज काढलं आणि ती रक्कम भामट्यांना ट्रान्सफर केली. ३० मे रोजी व्हॉट्सॲपवरून अचानक संपर्क तोडण्यात आला आहे. त्यानंतर फसवणूक लक्षात येताच त्यांनी अंबाजोगाई सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस करत आहेत.
Pune Crime News: चोरटे बंगल्यात शिरले अन् थेट ‘ही’ गोष्ट चोरून घेऊन गेले; कोथरूडमधली घटना