मोशी-चाकण मार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दोघांना धडक, एकाचा जागीच मृत्यू
अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्यातून चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. यामद्ये चारचाकी वाहन थेट नदीच्या पुलाचे कठडे तोडून पुलाखाली कोसळली आहे. हा भीषण अपघात अकोल्यातल्या वाडेगाव बाळापूर रस्त्यावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे.
28 लाखांची नोकरी सोडून बनला ठग; IIT च्या मित्रासोबत 400 कोटींहून अधिक रुपयांचा लावला चूना
कन्हैयासिंग ठाकूर (वय 54), विशाल भानुदास सोलनकर (वय 45) आणि सुनील शर्मा (वय 45) असे मृतकाचे नाव आहे. तर आशिष कन्हैयासिंग ठाकूर हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या अकोल्याचे शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र या अपघाताच्या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, अपघातात मरण पावलेली व्यक्ती हे बाळापूर शहरातील रहिवासी आहे. वाडेगावकडून बाळापुरकडे जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार , पातूर MH 30 ऐ-झेड 7557 क्रमांकाची कार थेट नदीच्या पुलावरील कठडे तोडून पलटी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई सुरु केली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकही जमले होते.
Pune Crime News: चोरटे बंगल्यात शिरले अन् थेट ‘ही’ गोष्ट चोरून घेऊन गेले; कोथरूडमधली घटना
पुणे: कोथरूड भागातील एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड भागातील सोलारिस क्लबजवळ श्रीनिकेतन सोसायटीत तक्रारदारांचा बंगला आहे.
शुक्रवारी मध्यरात्री चोरटे सीमाभिंतीवरुन उडी मारुन बंगल्यात शिरले. चोरट्यांनी बंगल्यातील चंदनाचे झाड कटरचा वापर करुन चोरुन नेले. बंगल्याच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तपास करत आहेत.
खराडीत आणखी एका मसाज पार्लरचा पर्दाफाश; पोलिसांनी छापा टाकून केली मोठी कारवाई