Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: बस थांबली अन् वृद्ध महिलेची बॅग गायब; १.७८ लाखांची चोरी करणाऱ्या चार महिला जाळ्यात

बस शेलूबाजारला थांबली, चार महिला रिक्षातून निघून गेल्या... पण वृद्ध महिलेने बॅग उघडताच धक्कादायक प्रकार समोर आला. दागिने आणि रोकड गायब असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग केला आणि काही वेळातच संपूर्ण टोळी पोलिसांच्या हाती लागली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 14, 2026 | 11:18 AM
Crime News: बस थांबली अन् वृद्ध महिलेची बॅग गायब; १.७८ लाखांची चोरी करणाऱ्या चार महिला जाळ्यात

Crime News: बस थांबली अन् वृद्ध महिलेची बॅग गायब; १.७८ लाखांची चोरी करणाऱ्या चार महिला जाळ्यात

Follow Us
Follow Us:
  • वृद्ध महिलेचे १.७८ लाखांचे दागिने-रोकड चोरीला
  • रिक्षातून पळणाऱ्या चार महिला पोलिसांच्या जाळ्यात
  • टोळीच्या जुन्या गुन्ह्यांचा तपास सुरू
 

वाशिम : बसमधून प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या चार महिलांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. मंगरूळपीर येथून अकोल्याकडे जाणाऱ्या बसमध्ये ही चोरी झाली. या घटनेत ७० वर्षीय महिलेच्या बॅगेतून सोन्याचे जुने वापरातील दागिने आणि २८ हजार रुपये रोख असा एकूण सुमारे १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध महिला मंगरूळपीरहून अकोल्याच्या दिशेने बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत चार महिलांनी त्यांच्या बॅगेतील दागिने आणि रोकड असलेली पिशवी लांबवली. शेलूबाजार येथे चारही महिला बसमधून उतरल्या. बस पुढे गेल्यानंतर वृद्ध महिलेने आपली बॅग तपासली असता दागिने आणि रोख रक्कम असलेली पिशवी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने आरडाओरड करत घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या.

हेही वाचा: झेड-प्लस सुरक्षेत मोठा भंग! ममतांच्या दिशेने चाकू घेऊन धावता प्रयत्न ‘पिशी’ म्हणत जवळ आली अन्…

रिक्षाचा पाठलाग करून टोळीला पकडले

बसमधून उतरलेल्या चारही महिला एका रिक्षातून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित रिक्षाचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर रिक्षा थांबवून पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतले. दरम्यान, तक्रारदार वृद्ध महिलेलाही घटनास्थळी बोलावण्यात आले. चौकशीदरम्यान संबंधित महिलांनी चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

जुन्या गुन्ह्यांचीही चौकशी

अटक करण्यात आलेल्या चारही महिलांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या टोळीने यापूर्वी अशाच पद्धतीने बसमधील प्रवाशांना लक्ष्य केले आहे का, इतर कोणत्या ठिकाणी चोरीचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या बॅगा हेरून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याने पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.

Web Title: Washim bus theft women gang arrest sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • Gold Theft
  • latest news
  • Washim Crime News
  • Washim news

संबंधित बातम्या

Crime News: नशेविरोधात आवाज उठवणं पडलं महागात; फेसबुक LIVEमध्येच कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या
1

Crime News: नशेविरोधात आवाज उठवणं पडलं महागात; फेसबुक LIVEमध्येच कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

Washim: रस्त्यावर ऑटो लावल्याने चालकावर हल्ला, रिसोडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना; पोलिसात तक्रार दाखल
2

Washim: रस्त्यावर ऑटो लावल्याने चालकावर हल्ला, रिसोडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना; पोलिसात तक्रार दाखल

Crime News: रेस्टॉरंट व्यावसायिक शिवा शर्मा मृत्यू प्रकरण; फरार मॉडेल श्रद्धा दुबेच्या फ्लॅटमध्ये आढळले संशयास्पद साहित्य
3

Crime News: रेस्टॉरंट व्यावसायिक शिवा शर्मा मृत्यू प्रकरण; फरार मॉडेल श्रद्धा दुबेच्या फ्लॅटमध्ये आढळले संशयास्पद साहित्य

Washim: कापूस खरेदीसाठी उपाययोजना, ४ केंद्रांवर ‘स्थानिक निगराणी समिती’ स्थापन; ‘कपास किसान अॅप’वर नोंदणीचे आवाहन
4

Washim: कापूस खरेदीसाठी उपाययोजना, ४ केंद्रांवर ‘स्थानिक निगराणी समिती’ स्थापन; ‘कपास किसान अॅप’वर नोंदणीचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.