Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: जबरी चोरी करणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ६ लाखांवर मुद्देमाल हस्तगत

Washim Chaddi Baniyan Gang Arrested Theft Case: वाशिम जिल्ह्यात बंद घरांचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरणाऱ्या कुख्यात आंतरराज्यीय चड्डी-बनियन टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, या कारवाईत सात घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 16, 2026 | 08:59 PM
Washim Chaddi Baniyan Gang Arrested

Washim Chaddi Baniyan Gang Arrested

Follow Us
Follow Us:
  • वाशिममध्ये चड्डी-बनियन टोळीचा पर्दाफाश
  • ७ घरफोडीचे गुन्हे उघड
  • ६.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम: जिल्ह्यात रात्रीच्यावेळी बंद घरांचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरी करणाऱ्या कुख्यात आंतरराज्यीय चड्डी-बनियन टोळीला वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, तब्बल ७घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. तसेच पोलिसांनी आरोपींकडून ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यात चड्डी बनियन घालून हातात धारदार शस्त्रे घेऊन चोऱ्या करणाऱ्या या टोळीची मोठी दहशत निर्माण झाली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार केले.

Washim: कारंजा-वाशिम मार्गावर भीषण दुर्घटना! दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू; परिसरात शोककळा

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणी बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे (२७, रा. विरेगाव, ता. जि. जालना), संजय मारुती शिंदे (३५, रा. विरेगाव, ता. जि. जालना) या २ आरोपींना अटक केली. तसेच त्यांचा आणखी एक साथीदार निष्पन्न झाला असून, हे आरोपी वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत असल्यामुळे आणि मोबाइलचा वापर करत नसल्यामुळे त्यांना पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.

मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहोरात्र रस्त्यांवर पाळत ठेवून शनिवारी त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. चौकशीदरम्यान मालेगाव, रिसोड, अनसिंग, वाशिम शहर, लोणार, चिखली (जि. बुलढाणा) येथे दाखल गुन्हाचा उलगडा झाला. सदर कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर आडे आणि मालेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि योगेश धोत्रे, सपोनि पांडुरंग इंगळे, पोलिस कर्मचारी गजानन झगरे, अशिष बिडवे, अमोल इरतकर, दीपक घुगे, संतोष वाप, अशोक कोठुळे आणि सुनील तायडे यांनी केली.

टोळीविरुद्ध घरफोडीचे अनेक गुन्हे

उघडकीस आलेल्या गुन्ह्यांपैकी मालेगाव पोलिस ठाण्यातील २ गुन्ह्यांमध्ये गेलेल्या मालापैकी ४१ ग्रॅम सोन्याचे व चांदीचे दागिने, असा एकूण ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या आरोपींवर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असून, पुढील तपास सुरू आहे.

Buldhana: मलकापुरात १२ डीजे मालकांविरुद्ध गुन्हा, दुर्गा स्थापना मिरवणुकीतील डीजेला दणका; आवाजाची नोंद १२०.४ डेसिबल

Web Title: Washim chaddi baniyan gang arrested 7 house burglary cases pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 08:59 PM

Topics:  

  • Washim
  • Washim Crime News

संबंधित बातम्या

Washim: कारंजा-वाशिम मार्गावर भीषण दुर्घटना! दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू; परिसरात शोककळा
1

Washim: कारंजा-वाशिम मार्गावर भीषण दुर्घटना! दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू; परिसरात शोककळा

Crime News: बस थांबली अन् वृद्ध महिलेची बॅग गायब; १.७८ लाखांची चोरी करणाऱ्या चार महिला जाळ्यात
2

Crime News: बस थांबली अन् वृद्ध महिलेची बॅग गायब; १.७८ लाखांची चोरी करणाऱ्या चार महिला जाळ्यात

Washim: रस्त्यावर ऑटो लावल्याने चालकावर हल्ला, रिसोडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना; पोलिसात तक्रार दाखल
3

Washim: रस्त्यावर ऑटो लावल्याने चालकावर हल्ला, रिसोडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना; पोलिसात तक्रार दाखल

Washim: पीक कापणी प्रयोग अचूक आणि पारदर्शकपणे राबवा; जिल्हाधिकाऱ्यांकडून इलखी येथे पाहणी
4

Washim: पीक कापणी प्रयोग अचूक आणि पारदर्शकपणे राबवा; जिल्हाधिकाऱ्यांकडून इलखी येथे पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.