Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा; दुचाकीवरून आलेल्या तरूणांनी कर्मचाऱ्यावर केले सपासप वार

पेट्रोलपंपाचे मॅनेजर निलेश तावरे व मालक ऋषिकेश गावडे यांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर मॅनेजर तावरे यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 12, 2025 | 11:32 AM
वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा

वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा

Follow Us
Follow Us:

कराड : पुणे-बंगलुरु महामार्गावरील वाठार (ता. कराड) गावच्या हद्दीतील गणेश पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री एकच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून आलेल्या दोन दरोडेखोरांनी पंपावरील कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार केले. तसेच त्यांनी कर्मचाऱ्याजवळील सुमारे सव्वा लाखाची रोकड हिसकावून तेथून पोबारा केला.

दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पेट्रोल पंपावरील परशुराम सिद्धार्थ दुपटे हा कर्मचारी जखमी झाला आहे. महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपावर दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी दरोडा टाकल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ‘वाठार (ता. कराड) गावच्या हद्दीत पुणे-बंगळुरु महामार्गालगत ऋषिकेश पांडुरंग गावडे यांच्या मालकीचा गणेश पेट्रोलपंप आहे. या पंपावर सोमवार (दि.१०) मध्यरात्रीच्या सुमारास कर्मचारी परशुराम दुपटे येणाऱ्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करत होते.

दरम्यान, रात्री 12 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून दोन युवक पेट्रोलपंपामध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले. त्यांनी दुपटे यांच्याकडून दुचाकीमध्ये पेट्रोल भरून घेतले. त्याचवेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाने दुपटे यांना पेट्रोलचे पैसे दिले. ते पैसे घेऊन दुपटे आपल्याजवळील बॅगमध्ये ठेवत असतानाच पाठीमागील युवकाने त्याच्या शर्टातून आणलेला कोयता काढून दुपटे यांच्या अंगावर, पायावर आणि हातावर सपासप वार केले. ते वार चुकवत दुपटे यांनी तेथून पळ काढला. त्याचवेळी दरोडेखोराने दुपटे यांच्या हातातील बॅग हिसकावून घेत दुचाकीवरून तेथून पोबारा केला. त्या बॅगमधील १ लाख २० हजार ९३५ रुपये दरोडेखोरांनी पळवून नेले.

पोलिसांची तीन पथके रवाना

घटना घडल्यानंतर याबाबत पेट्रोलपंपाचे मॅनेजर निलेश तावरे व मालक ऋषिकेश गावडे यांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर मॅनेजर तावरे यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच पुढील तपासाच्या अनुषंगाने पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.

Web Title: Robbery at petrol pump in wathar satara nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • Robbery case
  • Satara News

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा कहर, निसरेफाटा, एफिल, रासे परिसर जलमय; घरांमध्ये व दुकानगाळ्यांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान
1

मुसळधार पावसाचा कहर, निसरेफाटा, एफिल, रासे परिसर जलमय; घरांमध्ये व दुकानगाळ्यांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान

काळीज पिळवटून टाकणारी घटना! एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील ४ जणांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू
2

काळीज पिळवटून टाकणारी घटना! एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील ४ जणांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू

Satara Rain News: सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम! कोयना धरणात ३५.७१ टीएमसी साठा, प्रशासन सतर्क
3

Satara Rain News: सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम! कोयना धरणात ३५.७१ टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

Satara News : केळघर येथील रामजीबुवापूलावरील वाहतुक पूर्ववत! बांधकाम विभागाकडून तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी
4

Satara News : केळघर येथील रामजीबुवापूलावरील वाहतुक पूर्ववत! बांधकाम विभागाकडून तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.