Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: वेताळवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न; डिजिटल शाळा, सीसीटीव्ही आणि घरकुल योजनेच्या प्रस्तावांना प्राधान्य

गावातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामस्वच्छतेबाबत चर्चा झाली. कचरा संकलनासाठी घंटागाडीची सुविधा प्रभावीपणे राबविणे, गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे यावरही ग्रामस्थांनी सूचना मांडल्या. गावातील सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 20, 2026 | 01:04 PM
Vetalwadi Gram Sabha Patan, Satara Gram Panchayat News, Pandurang Nalawade Patan,

Vetalwadi Gram Sabha Patan, Satara Gram Panchayat News, Pandurang Nalawade Patan,

Follow Us
Follow Us:
  • सरपंच लक्ष्मीबाई पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली वेताळवाडी ग्रामसभा संपन्न.
  • साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग नलवडे यांची प्रमुख उपस्थिती.
  • पात्र लाभार्थ्यांची निवड आणि मुदतीत घरकुल बांधकामाचा ठराव मंजूर.
Vetalwadi Gram Sabha Patan: पाटण तालुक्यातील वेताळवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच लक्ष्मीबाई पुजारी होत्या. विशेष मार्गदर्शकअतिथी म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडुरंग नलवडे उपस्थित होते.

वेताळवाडी ग्रामपंचायत अधिकारी शितल खोकले यांनी उपस्थित ग्रामसभेतील ग्रामस्थांचे स्वागत करून सभेच्या कामकाजास सुरुवात केली. शासकीय परिपत्रकानुसार योजना व अभियानाची माहिती दिली. यामध्ये ग्रामसभेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थी निवड तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा आणि घरकुल योजनेची कामे नियमानुसार व वेळेत पूर्ण व्हावीत, याबाबत ग्रामसभेत विचारविनिमय करण्यात आला.

Mohan Bhagwat: ‘RSS नेत्यांचा सन्मान करू नका!’ अमेरिकेच्या सल्लागार आयोगाचे वादग्रस्त वक्तव्य; भारतीय परराष्ट्र मंत्रालय

ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकासकामांवरही चर्चा होऊन आवश्यक त्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंदर्भात ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आले. प्राथमिक शाळेतील वरिष्ठ शिक्षक धनराज अडसुळे यांनी शाळेला भेडसावणाऱ्या विविध अडचणी सर्वांच्या समोर मांडल्या. त्यानंतर गावातील प्राथमिक शाळांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, शाळांमध्ये डिजिटल सुविधा वाढविणे तसेच डिजिटल शाळेचा प्रस्ताव विचारात घेऊन आवश्यक सुधारणा करण्याबाबतही महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला.

गावातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामस्वच्छतेबाबत चर्चा झाली. कचरा संकलनासाठी घंटागाडीची सुविधा प्रभावीपणे राबविणे, गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे यावरही ग्रामस्थांनी सूचना मांडल्या. गावातील सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

ग्रामपंचायतीच्या हद्दीत उपलब्ध असलेल्या सरकारी जागेचा योग्य वापर करून भविष्यात विविध विकासकामांसाठी नवीन इमारती उभारण्याबाबतही विचार मांडण्यात आला. गावाच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन शासकीय जागेचा नियोजनबद्ध पद्धतीने उपयोग करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

FDA Action On Hotels:तुकाराम मुंढे जोमात हॉटेल मालक कोमात! FDAच्या कारवाईत मुंबईसह राज्यातील मोठ्या रेस्टॉरंट्सचे परवाने रद्द

यावेळी शिक्षण, वैद्यकीय सुविधा, महसूल विभाग, पाणीपुरवठा तसेच ग्रामविकासाशी संबंधित विविध विषयांवर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि संबंधित विभागांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

ग्रामसभेला सरपंच लक्ष्मीबाई पुजारी, विशेष अतिथी पांडुरंग नलवडे यांच्यासह उपसरपंच संतोष पवार, सदस्य संभाजी जाधव, सचिन नलवडे, संध्याराणी पवार, शोभा म्हस्के इत्यादी ग्रामपंचायत सदस्य, विविध खात्यांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध विकासकामांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Vetalwadi gram panchayat gram sabha holds in patan satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • gram panchayat
  • Patan News
  • Pradhan Mantri Awas Yojana
  • Satara News

संबंधित बातम्या

‘वरोशी ठरावावरून बोंब मारणाऱ्यांची लायकी काय?’; आंबेघर गणातील भाजप कार्यकर्ते आक्रमक
1

‘वरोशी ठरावावरून बोंब मारणाऱ्यांची लायकी काय?’; आंबेघर गणातील भाजप कार्यकर्ते आक्रमक

Satara Anti Encroachments Drive Shahupuri Chowk: सातारा नगरपालिकेचा शाहूपुरी चौकात हातोडा; २५ अतिक्रमणांवर फिरवला जेसीबी!
2

Satara Anti Encroachments Drive Shahupuri Chowk: सातारा नगरपालिकेचा शाहूपुरी चौकात हातोडा; २५ अतिक्रमणांवर फिरवला जेसीबी!

Wai Municipal Council: वाई नगरपालिकेला मोठा झटका!; ५ कोटींच्या बायोमायनिंग निविदेला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती
3

Wai Municipal Council: वाई नगरपालिकेला मोठा झटका!; ५ कोटींच्या बायोमायनिंग निविदेला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती

Satara News : अंतिम मतदार यादीकडे लक्ष; सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम सुरू
4

Satara News : अंतिम मतदार यादीकडे लक्ष; सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.