Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rupali Chakankar Arrest Demand: रुपाली चाकणकरांना अटक होणार?

भोंदू बाबा म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. उबाठा शिवसेना नेते संजय राऊत यानी खरात यांचा संपर्क थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कसा पोहोचला

  • By anuradha sagar
Updated On: Mar 30, 2026 | 10:55 AM
Rupali Chakankar, Ashok Kharat Case, SIT Inquiry, Tejaswi Satpute,

Rupali Chakankar, Ashok Kharat Case, SIT Inquiry, Tejaswi Satpute,

Follow Us
Follow Us:
  • रुपाली चाकणकर यांना SIT कडून समन्स
  • सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे यांची चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करण्याची मागणी
  • खरातचा संपर्क शाह यांच्यापर्यंत कसा? : संजय  राऊतांचा सवाल
Rupali Chakankar Arrest Demand: भोंदू अशोक खरातची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना समन्स बजावला आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर चौकशी व त्यानंतर अटकेची टांगती तलवार उभी राहिल्याचा दावा केला जात रुपाली ठोंबरे पाटील यांनी अशी शक्यता आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या बोलून दाखवली आहे.

अशोक खरातशी असणाऱ्या कथित संबंधांवरून रुपाली चाकणकरांना प्रथम राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद व त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून राजीनामा द्यावा लागला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे व राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी या प्रकरणी नाशिकच्या पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली होती. यामुळे पोलिसांवरील विशेषतः या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकावरील दबाव वाढला होता. या सर्व पार्श्वभूमीवर भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थान, मिरगाव या ट्रस्टवर सदस्य असल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांना हा समन्स बजावण्यात आला आहे.

Rupali chakankar Resign Breaking: अखेर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा 

चाकणकर प्रत्यक्ष हितसंबंध : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी या प्रकरणात रुपाली चाकणकर या कायद्याने सहआरोपी असल्याचा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, भोंदू बाबा प्रकरणात रुपाली चाकणकर सहआरोपी आहेत. कारण, त्यांनी पोलिसांवर टाकलेला दबाव आणि त्या स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या ट्रस्टवर होत्या.

भोंदू बाबा अशोक खरात यांच्याशी संपर्क असल्याच्या कारणावरुन मला विनाकारण ट्रोल केले जात आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच मी भोंदूबाबाकडे गेलो, मात्र त्या भोंदूवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे खरे रूप उघड झाले आहे. अशा भोंदूबाबांच्या नादी लागण्यापेक्षा आई-वडीलांचा सन्मान करणे अधिक महत्वाचे आहे. तेच आपले खरे देव असतात. त्यांच्यासारखे निः स्वार्थ प्रेम कोणीही करु शकत नाही. – दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री

खरातचा संपर्क शाह यांच्यापर्यंत कसा? : राऊत

भोंदू बाबा म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. उबाठा शिवसेना नेते संजय राऊत यानी खरात यांचा संपर्क थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कसा पोहोचला, याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. राऊत यांनी आरोप करताना म्हटले की, अशोक खरात हा केवळ भोदू बाबा नसून त्याचे सत्ताधाऱ्यांशी जवळचे संबंध आहेत, त्यामुळेच त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचा दावा त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व राजकीय नेत्यांची चौकशी होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तसेच, खरात प्रकरणात अनेक मोठ्या नेत्यांची नावे समोर येत असल्याने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष तपासणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

Rupali Chakankar News: भोंदूबाबाचे कारनामे भोवले! महिला आयोग

: रुपाली चाकणकर प्रकरणाबाबत पोलिस योग्य पद्धतीने कारवाई करत आहेत. समन्स देणे म्हणजे अंतिम निर्णय नसून, तपासानंतर पुढील कारवाई ठरते. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून, त्यावर भाष्य करणे योग्य नाही. संबंधितांकडे पुरावे असल्यास त्यांनी ते तपास यंत्रणांना द्यावेत.
– चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

अशोक खरात 66 यानी जे विविध गुन्हे केलेले आहेत ते गंभीर स्वरूपाचे असून ते एकट्याने केलेले नाहीत त्याची मोठी टीम त्याच्यासोबत होती. श्री शिवनिका संस्थानच्या तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या विश्वस्त सदस्य होत्या, सुनील तटकरे, रूपाली चाकणकर तसेच इतर सर्व विश्वस्त यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वेळोवेळी अशोक खरातला मदत केल्याच्या कारणास्तव त्यांना सहआरोपी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.. त्यांना अटक करावी.
– विकास लवांडे, संघटक सचिव, राष्ट्रवादी शरद पवार गट 

Web Title: Rupali chakankar arrest demand sit summons rupali chakankar arrest looming in fake baba ashok kharat scandal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • crime news
  • Nashik Crime
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

महाराष्ट्र पुन्हा हादरला! 5 वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार अन्…; माय-लेकीसोबत नक्की घडलं काय?
1

महाराष्ट्र पुन्हा हादरला! 5 वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार अन्…; माय-लेकीसोबत नक्की घडलं काय?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी; अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता
2

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी; अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या
3

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा
4

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.