Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaishnavi Hagawane Case: “… अशी मला खात्री आहे”; वैष्णवी मृत्यू प्रकरणात रूपाली चाकणकरांची महत्वाची प्रतिक्रिया

निलेश चव्हाण बांधकाम व्यवसायात असून तो पोकलेन मशीनच्या व्यवसायातही सक्रिय आहे. त्यामुळे शशांक हा हगवणेची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र म्हणून ओळखला जातो.

  • By तेजस भागवत
Updated On: May 30, 2025 | 08:11 PM
Vaishnavi Hagawane Case: “… अशी मला खात्री आहे”; वैष्णवी मृत्यू प्रकरणात रूपाली चाकणकरांची महत्वाची प्रतिक्रिया
Follow Us
Follow Us:

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहे. हगवणे प्रकरणातून राज्यभरात चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान आज  वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी फरार असणार्‍या निलेश चव्हाण याला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता. अखेर त्याच्या शोध पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यावर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भाष्य केले आहे.

पोलिसांनी नीलेश चव्हाणला बेड्या ठोकल्या आहेत. यावर बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, “वैष्णवी प्रकरणात ज्यांनी ज्यांनी आरोपीना मदत केली त्यांच्यावर कारवाई झाली आहे. आरोपीला शिक्षा होणे आणि पीडितेला न्याय देणे हीच आमची भूमिका आहे. ”

पुढे बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, “आपल्या सर्वांचे लक्ष हे वैष्णवीला न्याय मिळवून देण्यावर असले पाहिजे. तिच्या आई वाडीलयांसोबत उभे राहण्यावर असले पाहिजे. आरोपीना कठोरात कठोर शिक्षा होईल अशी मला खात्री आहे. पोलिस अत्यंत व्यवस्थितरित्या या गोष्टी तपास करत आहेत.

Vaishnavi Hagawane Case: मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला अटक, पिंपरी- चिंचवड पोलिसांची कामगिरी…

नीलेश चव्हाणला अटक

पिंपरी- चिंचवड पोलिसांची सहा पथक निलेश चव्हाणचा शोध घेत होते. तो परराज्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु, तो नेपाळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली आहे. लवकरच त्याला पिंपरी- चिंचवड मध्ये आणले जाणार आहे.

वैष्णवी हगवणेला आत्महत्येल प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबियांसह निलेश चव्हाणला बावधन पोलिसांनी सहआरोपी केले आहे. तर पुणे पोलिसांच्या वारजे पोलिसांनी त्याला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला. निलशे चव्हाण हा वैष्णवीची नणंग असलेल्या करिष्मा हगवणेचा मित्र आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण गेल्या १० दिवसांपासून फरार होता. नीलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्याचे चार विभाग आणि पुणे पोलिस ठाण्याचे तीन विभाग राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्ये तपास करत होते. अखेर, निलेश चव्हाणला अटक करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आले आहे.

Vaishnavi Hagawane Case: एमजी हेक्टर दिली तर गाडी पेटवून देईन..; वैष्णवीच्या वडिलांनी थेट पुरावेच दाखवले

कोण आहे निलेश चव्हाण?

निलेश चव्हाण बांधकाम व्यवसायात असून तो पोकलेन मशीनच्या व्यवसायातही सक्रिय आहे. त्यामुळे शशांक हा हगवणेची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र म्हणून ओळखला जातो. शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक संबंधांमध्ये निलेश अनेकदा सहभागी होता. १४ जून २०२२ रोजी पत्नीच्या तक्रारीवरून निलेश चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात निलेश आणि त्याचे काही नातेवाईक आरोपी होते. पुणे सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळूनही, वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामिन मंजूर केला होता. पुण्यातील कर्वेनगर भागातील औदुंबर पार्क सोसायटीमध्ये निलेश चव्हाणच्या वडिलांच्या नावे तीन फ्लॅट असल्याची माहिती आहे.

 

Web Title: Rupali chakankar statement on nilesh chvhan arrest vaishnavi hagavane death case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 08:11 PM

Topics:  

  • crime news
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 लाखांची खंडणी, घरात घुसून पट्ट्यानेही केली मारहाण
1

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 लाखांची खंडणी, घरात घुसून पट्ट्यानेही केली मारहाण

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
2

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
3

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
4

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.