Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांच्या बहिणीचे ‘भोंदूबाबा’ कनेक्शन उघड! पतसंस्थेतील खात्यातून ४० ते ५० कोटींचे संशयास्पद व्यवहार

या आर्थिक गैरव्यवहारानंतर आता एसआयटीने आपला मोर्चा संबंधित दोन पतसंस्थांकडे वळवला आहे. या दोन्ही पतसंस्थांचे चेअरमन आणि मॅनेजर यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे

  • By anuradha sagar
Updated On: Apr 02, 2026 | 04:23 PM
Ashok Kharat Case : रुपाली चाकणकर चौकशीला पुन्हा गैरहजर; आता पोलिसांनी बहिणीलाच बजावली नोटीस

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकर चौकशीला पुन्हा गैरहजर; आता पोलिसांनी बहिणीलाच बजावली नोटीस

Follow Us
Follow Us:
  • रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड
  • रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांच्या नावानेही या पतसंस्थांमध्ये खाते
  • ही सर्व बेनामी खाती खरात स्वतः हाताळत होता
 

Ashok Kharat Case update: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर आरोप झाल्याने त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड झाले आहे. नाशिकमधील पतसंस्थांमध्ये चाकणकर यांच्या बहिणीच्या नावाने खाते असल्याचे तपासातून उघड झाले आहे. भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणात रोज नवनवे खुसाले समोर येत आहेत. या प्रकरणात अनेक राजकीय नेतेमंडळी, मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची नावं समोर आली होती. खरातने अनेकांचे आधार आणि पॅन कार्ड वापरून नाशिकमधील दोन पतसंस्थांमध्ये शेकडो बेनामी खाती उघडली, त्या खात्यांच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांहून अधिक व्यवहार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावाने खाते

या प्रकरणातील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांच्या नावानेही या पतसंस्थांमध्ये खाते असल्याचे तपासात उघड झाले आहे. रुपाली चाकणकर यांनी आतापर्यंत अशोक खरातशी आपले कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा केला होता. तसेच त्याच्या व्यक्तिगत आयुष्यासंबंधी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले होते. पण ज्या पतसंस्थांमधून खरातने कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला, त्याच पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांचे बँकेचे खाते असल्याचे समोर आले आहे. संबंधित पतसंस्थेत प्रतिभा गणेश चाकणकर यांच्या नावाने खाते असून त्यातून ४० ते ५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.

एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; हिंजवडी पोलिसांची मोठी कारवाई

घोटाळ्याची कार्यपद्धती (Modus Operandi)

एसआयटीने केलेल्या प्राथमिक तपासात खरातच्या आर्थिक साम्राज्याची धक्कादायक पद्धत समोर आली आहे.
नाशिकमधील दोन विशिष्ट पतसंस्थांमधील शेकडो खात्यांवर अशोक खरातने स्वतःला ‘वारसदार’ (Nominee) म्हणून नोंदवले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, ज्या खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार झाले, त्या सर्व खात्यांना खरातचाच मोबाईल क्रमांक लिंक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सर्व बेनामी खाती खरात स्वतः हाताळत होता. लोकांचे आधार आणि पॅन कार्ड मिळवून त्यांच्या संमतीशिवाय ही खाती उघडण्यात आली होती.

 

घोटाळ्याची कार्यपद्धती (Modus Operandi):

नाशिक जिल्ह्यातील दोन पतसंस्थांमधील शेकडो खात्यांवर अशोक खरात स्वतः ‘नॉमिनी’ म्हणून नोंदवलेला आहे. ज्या खात्यांवरून करोडोंचे व्यवहार झाले, त्या सर्व खात्यांना खरातचाच मोबाईल नंबर लिंक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सर्व खाती अशोक खरात स्वतःच हाताळत होता आणि त्यातून त्याने काळा पैसा पांढरा केल्याचा संशय ‘एसआयटी’ला (SIT) आहे.

अपहरणाच्या प्रकरणातून ड्रग्जचे रॅकेट उघड; ‘ते’ 76 जण पोलिसांच्या रडावर

SIT कडून कसून चौकशी सुरू

या आर्थिक गैरव्यवहारानंतर आता एसआयटीने आपला मोर्चा संबंधित दोन पतसंस्थांकडे वळवला आहे. या दोन्ही पतसंस्थांचे चेअरमन आणि मॅनेजर यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर बोगस खाती उघडताना नियमांचे उल्लंघन झाले का, याचा तपास पोलीस करत आहेत.

 

 

 

Web Title: Rupali chakankars sister linked to ashok kharat scam 50 crore transactions under radar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • crime news
  • Nashik Crime
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

Jalgaon Crime : जामनेर ST डेपोमधून चोरट्यांनी पळवली नवीकोरी बस; वाटेत टायर पंचर अन् डाव फसला!
1

Jalgaon Crime : जामनेर ST डेपोमधून चोरट्यांनी पळवली नवीकोरी बस; वाटेत टायर पंचर अन् डाव फसला!

Pune Crime : कोंढव्यात स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय; महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन…
2

Pune Crime : कोंढव्यात स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय; महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन…

Delhi Crime: बायको की हैवान! पहिले दिली गोळी, मग दिला करंट अन् दोरीने घोटला गळा; नवऱ्याचा घेतला जीव
3

Delhi Crime: बायको की हैवान! पहिले दिली गोळी, मग दिला करंट अन् दोरीने घोटला गळा; नवऱ्याचा घेतला जीव

संतापजनक घटना! बँकेतून पैसे काढले अन् बाजारात भामट्यांनी डाव साधला! ८५ हजारांची रोख रक्कम लंपास
4

संतापजनक घटना! बँकेतून पैसे काढले अन् बाजारात भामट्यांनी डाव साधला! ८५ हजारांची रोख रक्कम लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.