Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर बकरी ईदपूर्वी १८ आरोपींवर कारवाई, ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अवैध गोवंश कत्तल आणि जनावरांच्या तस्करीविरोधात विशेष मोहीम राबवत ३७ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ५१ जनावरांची सुटका करण्यात आली असून १८ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 25, 2026 | 03:11 PM
Crime News: ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर बकरी ईदपूर्वी १८ आरोपींवर कारवाई, ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
Follow Us
Follow Us:

 

  • ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर
  • बकरी ईदपूर्वी १८ आरोपींवर कारवाई
  • ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी अवैध गोवंश कत्तल, गोमांस वाहतूक आणि जनावरांच्या तस्करीविरोधात धडक मोहीम उघडत जिल्हाभरात कारवाईचा सपाटा लावला आहे. १६ मेपासून सुरू असलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी १२ गुन्हे दाखल करत १८ आरोपींना निष्पन्न केले असून तब्बल ३७ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. विनय कुमार याठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील संवेदनशील व छुप्या मार्गावर विशेष नाकाबंदी, गस्त आणि छापेमारी मोहीम राबविली. वैजापूर, फुलंब्री, वडोद बाजार, करमाड, फर्दापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोड ग्रामीण, कन्नड ग्रामीण आणि खुलताबाद पोलिस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तपणे या कारवाया केल्या.

विविध कारवायांमध्ये ३९ जनावरांची सुटका

मोहिमेदरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून ८६५ किलो गोमांस जप्त केले. सुमारे ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचे हे गोमांस पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आले. दरम्यान, कतलीसाठी डांबून ठेवलेल्या १२ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. तसेच अवैध वाहतुकीदरम्यान आणखी ३९ जनावरे ताब्यात घेत सुरक्षितपणे गोशाळेत जमा करण्यात आली. या दोन्ही कारवायांत एकूण ११ वाहने जप्त करण्यात आली असून त्यामध्ये तीन वाहने गोमांस वाहतुकीतील तर आठ वाहने जनावरांच्या वाहतुकीतील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या सर्व वाहनांचे परवाने तसेच चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

संतापजनक! बस स्टँडवर तरुणीसमोर माथेफिरूचे अश्लील कृत्य; तरुणीने व्हिडीओ बनवला अन्…

५१ जनावरे तस्करांच्या तावडीतून मुक्त

विशेष मोहिमेत पोलिसांनी एकूण ५१ गोवंश जनावरांची सुटका केली. कत्तलखान्यातून १२ तर अवैध वाहतुकीतून ३९ जनावरे मुक्त करण्यात आली. सर्व जनावरांना पुढील संगोपनासाठी अधिकृत गोशाळेत पाठविण्यात आले आहे.

नागरिकांना आवाहन

जिल्ह्यात कुठेही अवैध गोवंश कत्तल, गोमांस विक्री किंवा जनावरांची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने डायल ११२ किंवा स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. r

Pune crime: संतापजनक! पतीने गॅस सिलेंडर डोक्यात घालून पत्नीची केली हत्या; पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः दिली कबुली

Web Title: Rural police in action mode action taken against 18 accused ahead of bakri eid contraband worth 38 lakhs seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
1

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले
2

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले
3

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?
4

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.