Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरले! अंधश्रद्धेतून विवाहित तरुणीचा अमानुष छळ; दर्ग्यात घेवून गेले अन्….

भुतबाधा झाल्याचे सांगत महिलेवर मारहाण करण्यात आली. तसेच संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काढून नातेवाईकांना पाठवण्यात आला. ही घटना २८ मार्च रोजी सायंकाळी मिसारवाडी परिसरात घडली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 06, 2026 | 03:54 PM
छत्रपती संभाजीनगर हादरले! अंधश्रद्धेतून विवाहित तरुणीचा अमानुष छळ (Photo Credit- AI)

छत्रपती संभाजीनगर हादरले! अंधश्रद्धेतून विवाहित तरुणीचा अमानुष छळ (Photo Credit- AI)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगर हादरले!
  • अंधश्रद्धेतून विवाहित तरुणीचा अमानुष छळ
  • दर्ग्यात घेवून गेले अन्….
Chhatrapati Sambhajinagar Crime News: संभाजीनगर शहरात अंधश्रद्धेच्या नावाखाली विवाहित तरुणीवर अमानुष छळ झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आधारकार्ड काढण्याच्या बहाण्याने पती, सासू व दीराने तिला दर्यात नेले. तेथे भुतबाधा झाल्याचे सांगत तिच्यावर मारहाण करण्यात आली. तसेच संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काढून नातेवाईकांना पाठवण्यात आला. ही घटना २८ मार्च रोजी सायंकाळी मिसारवाडी परिसरात घडली. या प्रकरणी दीर शेख हारुन शेख फकीर मोहम्मद व भोंदू बाबा अश्पाक उर्फ अशोक जाधव या दोघांना अटक करण्यात आली असून ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. पती शेख इरफान व सासू जकिरा शेख हे पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.

आधार केंद्राऐवजी दर्ग्यात नेण्यात आले

प्रकरणात २० वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली. तिचे वर्षभरापूर्वी लग्न झाले असून ती सासरच्या कुटुंबासोबत राहत होती. २८ मार्च रोजी पतीने आधारकार्ड बनवायचे असल्याचे सांगून तिला बाहेर नेले. त्यावेळी सासू व दीरही सोबत होते. मात्र तिला आधार केंद्राऐवजी दर्ग्यात नेण्यात आले. तेथे ‘भुतबाधा झाली आहे’ असे सांगत अश्पाक नावाच्या व्यक्तीकडे तिला नेले. त्याने तिला औषधाचा वास देऊन अगरबत्ती लावून मंत्रोच्चार सुरू केले. पुढील तपास पोलिस करत आहे.

Beed Crime: धक्कादायक! अंबाजोगाईत निवासी डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

व्हिडिओ पाठवला नातेवाईकांना

हा व्हिडिओ तिच्या भावाला पाठवण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांनी चौकशी केली असता आरोपींनी भुतबाधेचे कारण देत उर्मटपणे उत्तर दिले. पुढे २९ मार्च रोजी पीडितेच्या नातेवाईकांनी घरी जाऊन विचारणा केली असता ‘आता तिला नांदवणार नाही’ असे सांगत तिला माहेरी पाठवण्यात आले.

औषधाचा वास, मंत्रोच्चार व मारहाण

मंत्रोच्चार सुरू असताना सासूने तिचे केस मोकळे करून थपडा मारत जबरदस्तीने घुमण्यास भाग पाडले. त्यामुळे तिची मानसिक अवस्था बिघडली. काही वेळानंतर तिला घडलेला प्रकार आठवत नव्हता, असे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान रात्री उशिरा या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काढण्यात आला.

गुन्हा दाखल

या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात पतीसह चौघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ३५१ (२) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक योगेश गायकवाड करीत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar: हृदयद्रावक! मेहुण्याला वाचवू न शकल्याने तरुणाने संपवलं जीवन; आज माझा शेवटचा दिवस…

Web Title: Sambhajinagar married woman tortured superstition bhondu baba arrested misarwadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कडक आदेश; बोगस परवान्यांवर येणार गदा
1

रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कडक आदेश; बोगस परवान्यांवर येणार गदा

Chhatrapati Sambhajinagar: हृदयद्रावक! मेहुण्याला वाचवू न शकल्याने तरुणाने संपवलं जीवन; आज माझा शेवटचा दिवस…
2

Chhatrapati Sambhajinagar: हृदयद्रावक! मेहुण्याला वाचवू न शकल्याने तरुणाने संपवलं जीवन; आज माझा शेवटचा दिवस…

Nanded Crime : नांदेड हादरलं! मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या
3

Nanded Crime : नांदेड हादरलं! मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या

उदगीरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक, पोलीस वाहनांचे नुकसान; 47 जणांवर गुन्हा दाखल
4

उदगीरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक, पोलीस वाहनांचे नुकसान; 47 जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.