Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कडक आदेश; बोगस परवान्यांवर येणार गदा

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा परवान्यांची व्यापक फेरतपासणी करण्याचे आदेश दिले असून, या प्रक्रियेत चालकांना मराठी येते का याचीही पडताळणी केली जाणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 06, 2026 | 03:38 PM
रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कडक आदेश (Photo Credit- X)

रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कडक आदेश (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य!
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कडक आदेश
  • बोगस परवान्यांवर येणार गदा
Auto Rickshaw License Maharashtra: बोगस परवाने, प्रवाशांच्या तक्रारींचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ऑटोरिक्षा चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे परिवहन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा परवान्यांची व्यापक फेरतपासणी करण्याचे आदेश दिले असून, या प्रक्रियेत चालकांना मराठी येते का याचीही पडताळणी केली जाणार आहे. दरम्यान, या निर्णयाचा छत्रपती संभाजीनगर शहरातील रिक्षा संघटनांनी तीव्र विरोध केला आहे.

आधीच गॅस मिळत नसल्याने रिक्षाचालक अडचणीत आले आहेत. त्यात आता हा अध्यादेशामुळे त्यांच्या त्रासात भर पडणार असल्याचे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे. अलीकडच्या काळात बोगस कागदपत्रांच्या आधारे रिक्षा परवाने मिळवल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच, प्रवाशांशी संवाद साधताना मराठी न येणाऱ्या चालकांमुळे अनेक ठिकाणी वाद निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सार्वजनिक वाहन चालवणाऱ्या चालकांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे अपेक्षित आहे. मात्र, या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने आता प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. तूर्तास ही कारवाई मीरा-भाईंदर परिसरातून सुरू झाली आहे मात्र, पुढील काळात ती संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाण्याची शक्यता आहे.

ST Bus चा प्रवास सुलभ, डिजिटल होणार; CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते ‘या’ कार्डचे लोकार्पण

रोज नवनवे आदेश काढले जात आहेत. फक्त मराठीच बोला असा आदेश देणे म्हणजे परिवहन मंत्री हिंदी राष्ट्रभाषेचा अपमान करत आहेत. आज रिक्षाचालक गॅसच्या तुटवड्यामुळे आधीच अडचणीत आहेत. त्यात आता हा नवा नियम म्हणजे रिक्षाचालकांच्या त्रास भर पाडणारे आहे. आम्ही या निर्णयाचा आणि परिवहन मंत्र्यांचा निषेध करतो. राज्यात वर्षानुवर्षे राहूनही अनेकांना मराठी येत नसलेलेही लोक आहेत. तर दुसरीकडे अनेकांना हिंदीही येत नाही. भाषाभाषांत फरक पाडून परस्पर तेढ निर्माण करण्याचे काम परिवहन मंत्र्यांच्या या आदेशामुळे होणार आहे. असे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा असोसिएशन सलीम खामगावकर यांनी म्हटले आहे.

भाषा का महत्त्वाची ?

मोटार परिवहन विभागाच्या नियमांनुसार प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी मराठीचे ज्ञान आवश्यक आहे. स्थानिक भाषा येत नसल्यास प्रवाशांशी वाद होतात, संवादात अडचणी येतात, यामुळे सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. मराठी न येणाऱ्या चालकांचा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे. चुकीने परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही शिस्तभंग वा कारवाईचे संकेत आहेत. सध्या मुंबईत सुरु झालेली कारवाई लागू होऊ शकते.

‘2035 पर्यंत एसटी बसेस पूर्णत: होणार इलेक्ट्रिक’; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Web Title: Marathi language mandatory for rickshaw drivers transport minister pratap sarnaik issues strict orders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Auto Rikshaw
  • Chhatrapati Sambhajinagar
  • marathi
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

Mumbai Auto Taxi Shortage: मुंबईच्या रस्त्यांवर ऑटोची कमतरता; MMRमधील प्रवासावर ‘मराठी राजवटी’चा परिणाम
1

Mumbai Auto Taxi Shortage: मुंबईच्या रस्त्यांवर ऑटोची कमतरता; MMRमधील प्रवासावर ‘मराठी राजवटी’चा परिणाम

अतिक्रमण हटवलं, पण वाहतुकीचा प्रश्न कायम! साताऱ्यात रिक्षा थांब्यांच्या पुनर्नियोजनाची मागणी
2

अतिक्रमण हटवलं, पण वाहतुकीचा प्रश्न कायम! साताऱ्यात रिक्षा थांब्यांच्या पुनर्नियोजनाची मागणी

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
3

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत
4

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.