
फोटो सौजन्य सोशल मिडिया
त्यानुसार, फिर्यादीच्या वडिलांनी क्रांतीचौक परिसरात कर्मवीर दादासाहेब गायकवाड मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था सुरु केली होती. फिर्यादीच्या आई-वडिलांनी त्यांच्या ओळखीची महिला तुळसाबाई प्रधान हिच्या नावे सोसायटीचा सिटी सर्वे नंबर १७९५२ बरोल पॉट क्रमांक १७/१ क्षेत्र ४१.८२ चौरस मीटर हिच्या नावे अलॉटमेंट करून दिला होता, हा प्लॉट फिर्यादीने तुळसाबाई हिच्याकडून १३ जुलै २००४ रोजी खरेदी करण्याचे ठरवले होते. त्यावेळी एक लाख रुपयांचा व्यवहार उरून पॉटचा ताबाही देण्यात आल्याचे शिवराळे फियदिीत नमुद केले आहे.
१३ जुलै २००४ रोजी १९ हजार रुपये, १३ मे २००८ रोजी १२ हजार रुपये, २७जानेवारी २००९ रोजी १२ हजार रुपये आणि ७ जुलै २०११ रोजी ५० हजार रुपये रोख देण्यात आले. या व्यवहारांवेळी स्टॅम्प पेपरवर करारनामे करण्यात आले. २०१५ मध्ये तुळसाबाई प्रधान यांनी प्लॉटसाठी दहा लाख रुपये मागितले. त्यानंतर उर्वरित रक्कमही वेळोवेळी रोख दिल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
सर्व व्यवहारानंतर १८ ऑगस्ट २०२१ रोजी संबंधित प्लॉटचे नोंदणीकृत खरेदीखत करण्यात आले. हिवराळे यांनी हे खरेदीखत आपला मुलगा मिथिलेश सुरेश जोगदंडे यांच्या नावे करून घेतले. मात्र, मुलगी प्रसूतीसाठी पुणे येथे गेल्याने तिच्यासोबत राहण्यासाठी पुण्याला जावे लागल्यामुळे ही प्रक्रिया राहून गेली. परतल्यानंतर मुलाच्या नावे मालमत्ता पत्रकावर नाग्य लत्वण्यासाठी जिलाधिकारी कार्यालयात गेल्यावर संबंधित मालमत्ता विजय कीर्तिकर याच्या नावे असल्याची माहिती मिळाल्याचे फियोंदीत म्हटले आहे.
यानंतर हिवराळे यांनी मालमत्ता पत्रकाची प्रत चेताली. त्याचबरोबर दुष्यम निबंधक कार्यालयातून विजय कोर्तिकर यांच्या खरेदीखताची प्रत मिळविली. त्यातून १७ जानेवारी २०२३ रोजी दस्त क्रमांक ५०४/२०२३ अन्वये त्याच प्लॉटची विजय कीर्तिकर यांच्या नावे नोंदणी झाल्याचे निदर्शनास आल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हिवराळे यांनी सिटीचौक पोलिस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यता आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक भागवत मुठाळ करत आहेत.
तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्…