Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर हादरलं! गणेशोत्सवाचे ढोल ठेवण्यावरुन जीवघेणा हल्ला; तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. गणेशोत्सवाचे ढोल ठेवण्यावरून वाद झाला असतांना एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 23, 2025 | 02:22 PM
crime (फोटो सौजन्य: social media )

crime (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. गणेशोत्सवाचे ढोल ठेवण्यावरून वाद झाला असतांना एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यात जमीन मालकाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी आहेत. ही घटना छत्रपती संभाजीनगर एन-6 भागातील संभाजी कॉलनीतील घडली आहे.

Beed Crime News: आधी हत्या नंतर विल्हेवाट; CCTV मुळे हत्या उघड,अखेर महिला होमगार्डच्या खूनाचा उलगडा

मृतकाचे नाव प्रमोद पाडसवान असे असून त्यांचे वडील रमेश जगन्नाथ पाडसवान आणि प्रमोद यांचा मुलगा रुद्राक्ष पाडसवान गंभीर जखमी झाले.या प्रकरणी ज्ञानेश्वर काशीनाथ निमोने, गौरव काशीनाव निमोने, सौरव काशीनाथ निमोने, काशीनाथ येडू निमोने, शशिकला काशीनाथ निमोने व जावई मनोज दानवेसह अन्य आरोपींवर सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

पाडसवान यांच्या घराच्या समोरच असलेला सिडकोचा प्लॉट त्यांनी काही वर्षांपूर्वी विकत घेतला. गणेश मंडळाचा उत्सव पाडसवान यांच्या याच प्लॉटवर साजरा करण्यात येतो. या गणेश मंडळाचे अध्यक्ष निमोने असल्याने पाडसवान यांना त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी निमोने कुटुंब नेहमी खोडा घालायचा. त्यांनी त्याच प्लॉटवर मंडळाचे ढोल ठेवण्यासाठी शेड टाकले होते. सिडकोकडे अतिक्रमणाची रीतसर तक्रार केल्यावर एप्रिल महिन्यात त्यांनी हे अतिक्रमण हटवले होते.

१५ ते २० दिवसांपूर्वी पुन्हा त्याच ठिकाणी ढोल आणून ठेवले. त्यातून पाडसवान आणि निमोने कुटुंबांत वाद झाला, गणेशोत्सव जवळ येत असल्याने त्यांच्यातील वाद वाढत होता. पाडसवान कुटूंबाने बांधकामासाठी आणलेले साहित्य देखील त्या ठिकाणी पडलेले होते. पण साहित्य बाजूला करून घ्या आम्हाला तिथे कार्यक्रम करायचा असे म्हणून निमोने त्यांच्यावर दबाव टाकायचे. याच रागातून आणि निमोने कुटुंबाचे राजकीय तगडे सबंध आणि त्यातून वाढलेल्या दादागिरीनंतर त्यांनी पाडसवान कुटूंबावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये प्रमोद पाडसवान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Kolhapur Crime: कोल्हापुरमध्ये दोन गटात तुफान राडा आणि दगडफेक, कारण काय?

कोल्हापूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन गटात तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. या राड्यातून जोरदार दगडफे करण्यात आली. दोन गटातील या धुमश्चक्रीत काहीजण जखमी तर मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाले आहे. या राड्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कारण काय?

पुढे आलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील सिद्धार्थनगर परिसरात रात्री दोन समाजात वाद झाला आहे. उद्यानासमोर मंडळाचा फलक लावण्यावरून तसेच साऊंड, लाईट्सचे स्ट्रक्चर उभे करण्यावरून वाद निर्माण झाला. या वादातून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. दोन गटातील या मश्चक्रीत काहीजण जखमी झाले तर पाच ते सहा वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Pune crime : प्रेमसंबंधात आलेल्या दुराव्याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलांनी तरुणाचा काटाच काढला; नेमकं काय झालं?

Web Title: Sambhajinagar shaken fatal attack over ganesh chaturthi drumming youth dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: कोल्हापुरमध्ये दोन गटात तुफान राडा आणि दगडफेक, कारण काय?
1

Kolhapur Crime: कोल्हापुरमध्ये दोन गटात तुफान राडा आणि दगडफेक, कारण काय?

Pune crime : प्रेमसंबंधात आलेल्या दुराव्याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलांनी तरुणाचा काटाच काढला; नेमकं काय झालं?
2

Pune crime : प्रेमसंबंधात आलेल्या दुराव्याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलांनी तरुणाचा काटाच काढला; नेमकं काय झालं?

Beed Crime News: आधी हत्या नंतर विल्हेवाट; CCTV मुळे हत्या उघड,अखेर महिला होमगार्डच्या खूनाचा उलगडा
3

Beed Crime News: आधी हत्या नंतर विल्हेवाट; CCTV मुळे हत्या उघड,अखेर महिला होमगार्डच्या खूनाचा उलगडा

Buldhana Crime: मुंबईतील सराफा व्यापाऱ्यास समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी लुटलं, पावणे पाच किलो सोन्यासह रोक रक्कम घेऊन पसार
4

Buldhana Crime: मुंबईतील सराफा व्यापाऱ्यास समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी लुटलं, पावणे पाच किलो सोन्यासह रोक रक्कम घेऊन पसार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.