१९ ऑगस्ट रोजी एका अज्ञात युवकाचा मृतदेह शिंदेवाडी (ता. भोर) परिसरात जुन्या कात्रज बोगद्याच्या अलीकडील डोंगरावर सापडला. राजगड पोलीस घटनास्थळी दाखल होत पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनीही तपासाची जबाबदारी घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोलिसांनी चौकशीला सुरवात केली असता चौकशीत मृतांची ओळख झाली. मृतकाचे नाव सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. मांगडेवाडी, पुणे, मूळ सोलापूर) अशी पटली होती. त्याच्या नातेवाईकांनी एक दिवस आधीच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. त्यांनतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत राजगड पोलिसांनी तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फूटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने वेगाने तपास सुरू केला.
Panchgani Crime News: पोलीस असल्याचे भासवत दिवसाढवळ्या अपहरण; पाचगणीत बंदुकीचा धाक दाखवत तडजोड
तपासादम्यान डी. बी. पथकातील पो.शि. अक्षय नलावडे यांच्या समोर धक्कादायक माहिती आली की, एक अल्पवयीन बालक आणि त्याच्या साथीदारांनीच सौरभचा खून केला आहे. यांनतर पोलिसांनी सापळा रचून श्रीमंत अनिल गुन्जे (वय २१, रा. खंडोबा मंदीर जवळ, वडगाव मावळ), संगम नामदेव क्षीरसागर (वय १९, रा. ढोले वाडा, वडगाव मावळ), नितीन त्र्यंबक शिंदे (वय १८ वर्षे, रा. गोकुळनगर कात्रज) तसेच दोन अल्पवयीन मुलांना अवघ्या 12 तासात ताब्यात घेतले.
नेमकं काय आहे प्रकरण?
सौरभ आठवले याने मांगडेवाडीतील एका अल्पवयीन मुलीला बहिण मानले होते. मुलीच्या घरच्यांची सौरभ याचे घरगुती संबंध प्रस्थापित झाल्याने, तीला शाळेत आणणे- सोडण्याचे कामं सौरभ करत असे. मात्र त्याच मुलीशी आरोपींपैकी एका अल्पवयीन मुलाचे प्रेमसंबंध होते. हे प्रकरण सौरभला कळल्यानंतर त्यानी हे मुलीच्या कुटुंबीयांना सांगितले. यानंतर संबंधित मुलाला तो राहत असलेल्या मुली शेजारच आत्याचे घर सोडून, त्याच्या वडिलांनी त्याला पुन्हा वडगाव मावळ येथील त्याच्या वडिलांच्या घरी बोलवले. त्यामुळे प्रेमसंबंधात आलेल्या दुराव्याचा राग मनात धरून त्याने मित्रांच्या मदतीने सौरभचा खून करण्याचा कट रचला. सौरभला बोलावून डोंगरात नेण्यात आले आणि कोयत्याने आणि इतर हत्यारांनी वार करून त्याचा हत्या करण्यात आली.
आरोपींना अटक
संशयित आरोपींकडून ॲक्टिव्हा, स्प्लेंडर मोटारसायकल आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. काळ्या रंगाची मोटारसायकलही हस्तगत करण्यात आली असून महत्त्वाचे तांत्रिक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. अटक संशयित आरोपींना भोर न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
Beed Crime News: आधी हत्या नंतर विल्हेवाट; CCTV मुळे हत्या उघड,अखेर महिला होमगार्डच्या खूनाचा उलगडा