Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: संतापजनक! मनोरुग्ण मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाचा टोकाचा पाऊल; डोक्यात दगड घालून मुलाचा खून

सांगलीच्या वाळवा तालुक्यात वडिलांनी मनोरुग्ण मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले असून घटनेमुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 13, 2026 | 12:16 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मनोरुग्ण मुलाच्या त्रासामुळे वडिलांचा टोकाचा निर्णय
  • डोक्यात दगड घालून मुलाचा खून; वडील ताब्यात
  • घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर
सांगली: सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोरुग्ण असलेल्या मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून वडिलांनीच पोटच्या मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव इथे घडली.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील हत्या झालेल्या मुलाचे नाव निखिल यादव (वय वर्ष ३१) असे आहे. तर हत्या करणाऱ्या वडिलांचे नाव पासष्ट वर्षीय अरुण यशवंत यादव असे आहे. निखिल हा आई-वडिलांना गेल्या दोन वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद घालून तो भांडण करीत होता. शनिवारी रात्री निखिल आणि वडील अरुण यादव यांचे भांडण झाले. मनोरुग्ण असल्याने त्याला कित्येक वेळा सांगून समजावून घेतले तरी त्याचा त्रास वाढतच होता. निखिलवर ईश्वरपूर येथे उपचार सुरू होते. मनोरुग्ण असलेल्या पोटच्या मुलाचा सततचा त्रास सहन न झाल्याने रविवारी पहाटे चार वाजता वडिलांनी निखिलच्या डोक्यात दगड घालून त्याला संपविले.

Crime News : जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; डोक्यात कोयता घातला अन्…

पोलीस तपास सुरु

निखिल हा एकुलता एक मुलगा असून त्याची आई सुलभा या अंगणवाaडीत काम करतात. निखिलच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

यात्रेत धक्काबुक्कीचा वाद जीवावर; कवलापूरमध्ये दगडाने ठेचून तरुणाचा खून, आरोपी अटकेत

सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कवलापूरमध्ये सिद्धेश्वर यात्रेत एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. याच वादातून डोक्यात दगड घालून एका तरुणाची हत्या करण्यात आली. विश्वास कल्लाप्पा सुतार (वय 34, रा. कवलापूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

काय नेमकं घडलं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव रोहित ऊर्फ नवनाथ श्रीरंग नाईक (वय 24, रा. कवलापूर, मूळ रा. भोसे, ता. मिरज) असे आहे. मिरज तालुक्यातील कवलापूर येथील सिद्धेश्वर देवाची यात्रा सुरू आहे. या यात्रेत तमाशाचा कार्यक्रम सुरू होता. यात्रेनिमित्त परिसरात मोठी गर्दी जमली होती. या गर्दीतून जाताना विश्वास आणि संशयित रोहित यांचा एकमेकांना धक्का लागला. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. एकमेकांना शिवीगाळही झाली. यावर संतापलेल्या रोहितने विश्वासला धक्का देऊन खाली पाडले आणि रस्त्यावरील दगड त्याच्या डोक्यात घातला.

विश्वास जीवाच्या आकांताने ओरडल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली आणि रोहितला पकडून ठेवले. विश्वासला गंभीर जखमी अवस्थेतच सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विश्वास हा कवलापूर-कुमठे फाटा रस्त्यावरील हॉटेलमध्ये वेटर होता. दरम्यान, याप्रकरणी सूरज भूपाल सुतार याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक पुढील तपासणी करत आहेत.

Solapur Crime: पंढरपुरातील त्या ॲसिड हल्ल्यात मोठा ट्विस्ट, तरुणीनेच रचला स्वतःवर हल्ल्याचा बनाव; कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: खून का करण्यात आला?

    Ans: मुलाच्या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: मुलाचे वडील अरुण यादव.

  • Que: पोलिसांची कारवाई काय आहे?

    Ans: आरोपी वडिलांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Sangli crime driven to the brink by the torment caused by his mentally ill son a father takes a drastic step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • crime
  • Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत
1

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना
2

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना

Hyderabad : महिला सहकारी अधिकाऱ्याच्या आरोपांनंतर IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमुळे प्रकरणाला नवं वळण
3

Hyderabad : महिला सहकारी अधिकाऱ्याच्या आरोपांनंतर IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमुळे प्रकरणाला नवं वळण

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत
4

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.