प्रकरण काय?
ऍसिड हल्ला झाल्यावर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तसेच पीडित तरुणीचे जबाब नोंदवले. मात्र, तिने दिलेल्या जबाबातील विसंगती आणि सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद हालचाली न आढळल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, अखेर त्या मुलीने स्वतःच हा बनाव रचल्याची कबुली दिली.
कारण काय?
हा सर्व प्रकार घरगुती वादातून आणि वैयत्तिक कारणातून घडला आहे. घरात काही कारणावरून वाद झाले होते. याच वादातून घरच्यांना धडा शिकवण्यासाठी किंवा अन्य काही कारणास्तव तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. या तरुणीने स्वतःच घरातील टॉयलेट साफ करण्याचे ॲसिड घेतले आणि एका अंधाऱ्या ठिकाणी जाऊन ते स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. त्यानंतर आपल्यावर अज्ञाताने ॲसिड हल्ला केल्याचा बनाव तिने रचला होता. या घटनेने खळबळ उडाली होती.
हुंड्यासाठी 50 लाखांची मागणी, मूलही होऊ दिलं नाही; विवाहितेचे गंभीर आरोप, राजकीय कुटुंब अडचणीत
सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्योग व्यवसायासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आल्याचे समोर आले आहे. हे आरोप पंढरपुरातील प्रतिष्ठित राजकीय कुटुंबावर करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरची आहे.
घटस्फोट होण्याआधीच लग्न
या प्रकरणात विशेष म्हणजे, ऐश्वर्या माहेरी गेल्यानंतर रोहनने बारामतीमधील एका मुलीशी लग्न केले. ऐश्वर्या आणि रोहनचा घटस्फोट होण्याआधीच त्याने सदर लग्न केले. रोहनचा नगरसेवक भाऊ राहुल यांच्यासह कुटुंबाने माहेरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. यापूर्वी, आम्ही एका कुटुंबाला असंच संपवलं असून तुम्हालाही संपवू अशी धमकी दिली. घटस्फोटासाठी दबाव देखील टाकण्यात येत असल्याचा आरोप पीडित विवाहितेने केला आहे.
Ans: नाही, तरुणीने स्वतःच बनाव रचल्याचे उघड झाले.
Ans: सीसीटीव्ही फुटेज आणि जबाबातील विसंगतीतून संशय बळावला.
Ans: घरगुती वादातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले.






