Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News: क्रूरतेची परिसीमा! पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, गळ्यावर चाकूचे वार; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

सांगली जिल्ह्यातील विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या रामचंद्र उर्फ संतोष कदम याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. घरगुती वादातून आरोपीने पत्नी दिपाली यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत पेटवले आणि चाकूने गळ्यावर वार केला होता. ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 28, 2026 | 02:24 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पत्नी दिपाली कदम यांना जिवंत पेटवून आणि गळ्यावर वार करून हत्या केल्याप्रकरणी पती दोषी.
  • विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशी आणि ₹1 लाख दंडाची शिक्षा सुनावली.
  • ठोस पुरावे आणि साक्षींच्या आधारे न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; पीडित कुटुंबाला न्याय.
सांगली: सांगली जिल्ह्यातील विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पत्नीची अत्यंत क्रूरपणे हत्या करणाऱ्या पतीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. घरगुती वादातून पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत पेटवणे आणि त्यानंतर चाकूने गळ्यावर वार करून हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली. या निकालामुळे चार वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

काय नेमकं प्रकरण?

७ जून २०२१ रोजी खानापूर तालुक्यातील भुड येथे ही घटना घडली होती. घरगुती वादातून आरोपीने पत्नी दीपाली कदम यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत पेटवले. त्यांनतर चाकूने गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दीपाली कदम यांचा उपचारादरम्यान ११ जून २०२१ रोजी मृत्यू झाला.

प्रवाशाचा धक्कादायक कारनामा! धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग ओढले अन्…; लातुरातील घटना

या प्रकरणी पोलिसांनी महिलेचे भाऊ राहुल सुळे यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी सादर केलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने कठोर निर्णय दिला. आरोपीला मरेपर्यंत आरोपी रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम (41) याला फाशीची शिक्षा तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. या निकालामुळे पीडितेच्या मुलांना न्याय मिळाल्याची भावना पोलिसांनी व्यक्त केली आहे.

शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर

सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतजमिनीच्या हद्दीच्या वादाने बुधवारी हिंसक वळण घेतले. जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आले आणि त्याचे रूपांतर तलवार व दगडांनी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात झाले. या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले असून संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. घडलेली घटना वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी गावातील आहे.

Chitrakoot Crime: रील बनवायला गेले अन् वनकर्मचारी असल्याचं सांगत जवळ आले…; जंगलात 3 नराधमांनी NEET विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीला कोणती शिक्षा सुनावण्यात आली?

    Ans: मरेपर्यंत फाशी आणि ₹1 लाख दंड.

  • Que: पीडित महिलेचे नाव काय होते?

    Ans: दिपाली कदम.

  • Que: ही घटना कधी घडली होती?

    Ans: 7 जून 2021 रोजी.

Web Title: Sangli news the height of cruelty wife doused with petrol and burned alive stabbed in the neck historic court verdict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • crime
  • Crime in Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

पाचगणी पोलिसांची कमाल! 25 गहाळ मोबाईल शोधले; सायबर फसवणुकीतील दीड लाखही परत मिळवून दिले
1

पाचगणी पोलिसांची कमाल! 25 गहाळ मोबाईल शोधले; सायबर फसवणुकीतील दीड लाखही परत मिळवून दिले

Chitrakoot Crime: रील बनवायला गेले अन् वनकर्मचारी असल्याचं सांगत जवळ आले…; जंगलात 3 नराधमांनी NEET विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं
2

Chitrakoot Crime: रील बनवायला गेले अन् वनकर्मचारी असल्याचं सांगत जवळ आले…; जंगलात 3 नराधमांनी NEET विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं

Raigad Crime: नात्यांना काळिमा! दोन मुलांनीच आई-वडिलांचा गळा आवळून केला खून; 12 तासांत पोलिसांनी केला उलगडा
3

Raigad Crime: नात्यांना काळिमा! दोन मुलांनीच आई-वडिलांचा गळा आवळून केला खून; 12 तासांत पोलिसांनी केला उलगडा

Ulhasnagar Crime: उल्हासनगर हादरलं! प्रेमासाठी घरातून पळून जाणार होती; आईला समजताच निर्घृण हत्या
4

Ulhasnagar Crime: उल्हासनगर हादरलं! प्रेमासाठी घरातून पळून जाणार होती; आईला समजताच निर्घृण हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.