पुणे: पुण्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. सिमेंट मिक्सरच्या खाली चिरडून एका ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर तिची आई गंभीर जखमी झाली आहे. जड वाहनांना मनाई असलेल्या वेळेत बेदरकार मिक्सर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 12ऑगस्ट) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिंजवडी, फेज 2 येथील इन्फोसिस सर्कलजवळ घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…
मृत्यू झालेल्या मुलीचे नाव प्रत्युषा संतोष बोराटे (वय 11) असे आहे. तर वैशाली बोराटे (35) जखमी झाल्या आहे. या प्रकरणी सागर सुभाष आगलावे (रा. बुधवार पेठ, पुणे) यांनी बुधवारी (दि. 13ऑगस्ट) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मिक्सर ट्रकचालक फरहान मुन्नू शेख (25, रा. वाकड) याला अटक केली आहे. हिंजवडी फेज २ येथील इन्फोसिस सर्कल झालेल्या या अपघाताचा सीसीटीव्ही सुद्धा आता समोर आला आहे. हिंजवडी परिसरात सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 9 या कालावधीत अवजड वाहनांना वाहतूक करण्यास मनाई असताना सुद्धा भरधाव वेगात फरहान शेखने मिक्सर ट्रक चालवला होता. या बाबतचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
व्हिडिओत काय?
या अपघाताच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला चिरडून सिमेंट मिक्सर पुढे जातांना दिसत आहे. तो सिमेंट मिक्सर मायलेकींना चिरडून पुढे जातो, काही वेळात ही गंभीर घटना सर्वांना समजली, या घटनेमध्ये 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली आहे.
मध्यरात्री भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी
मध्यरात्रीच्या सुमारास दोन भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. पहिला अपघात चिपळूण कराड मार्गावर झाला आहे. या अपघातात ५ जण जागीच ठार झाल्याचे समोर आले आहे. तर दुसरा अपघात लातूर जिल्ह्यातील तावशी ताडा पाटी येथे घडला आहे. एका खाजगी प्रवासी बसने आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याचे समोर आले आहे. अपघातावेळी बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते, दोन वाहक आणि एक सहाय्यक देखील यांच्यासोबत प्रवास करत होता. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहे.