Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shikrapur Crime News: बँक मॅनेजरकडून महिलेची 94 लाखांची फसवणूक; चेक बँकेत न भरता…, प्रकरण वाचाच…

Fraud News: बँकेच्या एरिया मॅनेजर कडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने महिलेने तातडीने शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 15, 2025 | 07:18 PM
Shikrapur Crime News: बँक मॅनेजरकडून महिलेची 94 लाखांची फसवणूक; चेक बँकेत न भरता…, प्रकरण वाचाच…
Follow Us
Follow Us:

शिक्रापूर:  कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या असिस्टंट एरिया मॅनेजरने खातेदार महिलेचा चेक घेऊन पैसे बँकेच्या खात्यात वर्ग न भरता स्वतः सह पत्नी व मैत्रिणीच्या खात्यात वर्ग करुन महिलेला बनावट पावत्या दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये महिलेची तब्बल ९३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचा कोरेगाव भीमा शाखेतील असिस्टंट एरिया मॅनेजर विकास गुलाब बेलदार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वढू बुद्रक ता. शिरुर येथील योगिता आरगडे या महिलेच्या कुटुंबीयांनी कोरेगाव भीमा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये महिलेचे बचत खाते काढून शेतीच्या उत्पन्नातून मिळणारे पैसे सदर खात्यावर जमा केलेले होते.  २०२३ मध्ये महिलेने बँकेत जाऊन तत्कालीन बँक मॅनेजर नेहा नलावडे यांना भेटून आमच्या खात्यावरील पैसे बँकेतील चांगला परतावा मिळणाऱ्या स्कीममध्ये गुंतवायचे असल्याबाबत सांगितले.

दरम्यान नेहा नलावडे यांनी योगिता यांना एरिया मॅनेजर विकास बेलदार यांना भेटण्यास सांगितले असता बेलदार यांनी महिलेला एक स्कीम सांगत त्यांच्या खात्यावरील काही चेक घेऊन महिलेसह महिलेचा भाऊ, आई, मावस भाऊ यांचे बँकेतील लाईफ फिक्स डिपोजीट स्कीमच्या वेगवेगळ्या पावत्या देऊन महिलेच्या खात्याचे तब्बल ९३ लाख ४० हजार रुपयांचे चेक घेतले.  त्यांनतर महिलेच्या खात्यातील पैसे देखील वर्ग झाले, नुकतेच महिलेच्या सदर स्कीमची मुदत २०२५ मध्ये संपत असल्याने महिला सर्व पावत्या घेऊन बँकेत गेली असता सदर सर्व पावत्या बनावट असल्याचे समोर आल्याने महिला चक्रावून गेली.

हेही वाचा: Shikrapur Crime News: भाडेकरुने दुचाकी चोरली अन्…; आरोपीला नाशिकमधून अटक

त्यांनी बँकेचे स्टेटमेंट तपासले असता त्यांच्या खात्यातील रक्कम विकास गुलाब बेलदार, सरला विकास बेलदार व राव बालाजी तेलंग यांच्या खात्यात वर्ग झाल्याचे समोर आल्याने, त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचा कोरेगाव भीमा शाखेतील तत्कालीन असिस्टंट एरिया मॅनेजर विकास बेलदार यांच्याशी संपर्क साधला असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

त्यामुळे बँकेच्या एरिया मॅनेजर कडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने योगिता श्रीकृष्ण आरगडे वय ३९ वर्षे रा. चौफुला रोड वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे यांनी याबाबत  शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन असिस्टंट एरिया मॅनेजर विकास गुलाब बेलदार रा. लक्ष्मी नारायण नगर वडमुखवाडी चऱ्होली पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतिक जगताप हे करत आहे.

Web Title: Sbi bank asistant manager fraud with rupees 94 lakhs with woman koregaon bhima shikrapur crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 07:18 PM

Topics:  

  • Bank Fraud
  • police
  • Shikrapur Crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Drug Free Campaign: तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’; नवी मुंबई पोलिसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
2

Drug Free Campaign: तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’; नवी मुंबई पोलिसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

Navi Mumbai bars closed: नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण
3

Navi Mumbai bars closed: नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
4

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.