Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Supreme Court: दिल्ली-NCRमधील अलीकडील बलात्काराच्या घटनांची स्वतःहून दखल घेत सुप्रीम कोर्टाने महिला सुरक्षेबाबत केंद्र आणि दिल्ली पोलिसांना प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय करण्यास सांगितले. रात्री १० वाजताही रस्त्यावरून चालताना किंवा मेट्रो व अन्य वाहतुकीने प्रवास करताना प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटले पाहिजे...

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 05, 2026 | 02:38 PM
‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला....', बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला....', बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • महिलांच्या सुरक्षेसाठी गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण करा
  • दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश
  • दिल्लीतील महिला सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाची चिंता
Supreme Court: दिल्ली-NCRमध्ये अलीकडे समोर आलेल्या महिला आणि अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने या घटनांची यापूर्वीच स्वतःहून दखल घेतली होती.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने महिला सुरक्षेसाठी केवळ घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यावर भर दिला. दिल्लीतील प्रत्येक महिलेला रात्री १० वाजताही रस्त्यावरून चालताना किंवा मेट्रो आणि रस्ते वाहतुकीतून प्रवास करताना सुरक्षित वाटले पाहिजे, असे खंडपीठाने केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना सांगितले. संभाव्य गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल अशा पद्धतीने प्रतिबंधात्मक कारवाई आवश्यक असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या

न्यायालयाने दखल घेतली

या प्रकरणात दिल्लीतील आस्था कुंज पार्कमधील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार, स्वरूप नगरमधील किशोरीवरील सामूहिक बलात्कार व हत्या आणि ग्रेटर नोएडाहून दिल्लीकडे येणाऱ्या स्लीपर बसमध्ये अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार अशा घटनांची न्यायालयाने दखल घेतली आहे. स्लीपर बस जवळपास ४७ किलोमीटर अंतर पार करूनही ती रोखता आली नसल्याबद्दल न्यायालयाने यापूर्वी चिंता व्यक्त केली होती.

आस्था कुंज पार्क परिसरातील सुरक्षेबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्याचा मुद्दा न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आला आहे. लेडी श्रीराम कॉलेजच्या विद्यार्थिनींनी लैंगिक छळाबाबत केलेल्या पूर्वीच्या तक्रारींनंतरही पुरेशी गस्त आणि देखरेख वाढवण्यात आली नसल्याबद्दल न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत.

पोलिसांची गस्त वाढवणे

यापूर्वी 28 सप्टेंबरच्या आदेशात सुप्रीम कोर्टाने संवेदनशील ठिकाणांची ओळख, पोलिसांची गस्त वाढवणे, प्रकाशव्यवस्था आणि CCTVचे ऑडिट, वाहनांची तपासणी आणि नागरिकांच्या तक्रारींसाठी प्रभावी यंत्रणा यांसारख्या उपायांवर भर दिला होता. या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवालही मागवण्यात आला आहे.

स्लीपर बसमधील घटनेचा उल्लेख करताना न्यायालयाने 2012 च्या निर्भया प्रकरणाशी वेदनादायी साम्य असल्याचेही यापूर्वी नमूद केले होते. महिला आणि मुलींना सार्वजनिक ठिकाणी भीतीमुक्त वातावरण मिळणे हा प्रतिष्ठेने जगण्याच्या घटनात्मक अधिकाराचा भाग असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

UP News : योगी आदित्यनाथ यांचा आणखी एक ‘मास्टरस्ट्रोक’! भदोही जिल्ह्याचे बदलले नाव, आता नुस्ता विकास!

Web Title: Supreme court directs delhi police to ensure women safety even at 10 pm over recent rape cases sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • delhi
  • police
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या
1

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या

Kalyan Redevelopment Project: पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला! कल्याणमध्ये दोन गट भिडले, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
2

Kalyan Redevelopment Project: पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला! कल्याणमध्ये दोन गट भिडले, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
3

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक
4

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.