crime (फोटो सौजन्य: social media )
अकोला: एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क दारूच्या नशेत एसटी बुसीमधील चालकाने आणि वाहनाने चक्क दारूच्या नशेत बस चालवल्याची गंभीर घटना घडली आहे. पंढरपूरहून अकोला जिल्ह्यातील अकोटकडे निघालेल्या एसटी बस मध्ये हा प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे ३७ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी संताप व्यक्त करत रोष व्यक्त केला आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, अकोट आगाराची एमएच-14-6140 क्रमांकाची ही बस असून ही बस पंढरपूरहून अकोटकडे प्रवास करत होती. यातील चालक संतोष राहते आणि वाहक संतोष झालटे हे बस चालवत होते. दरम्यान हे दोघे दारू पियुन असल्याचे प्रवाश्यांना निर्दर्शनात आले. यावेळी बसमधे ३७ प्रवाशी प्रवास करत होते. या साऱ्या प्रवाश्यांचा जीव धोक्यात आला होता. हा प्रकार लक्षात येताच मोठा अनर्थ टळला आहे. संतप्त प्रवाशांच्या तक्रारीनंतर बीड पोलीस आणि एसटी प्रशासनाने दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस आणि राज्य परिवहन विभाग नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
सोसायटीत बॅडमिंटन खेळतांना विजेचा लागला शॉक; १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
नायगाव: नायगावच्या बीच कॉम्प्लेक्समध्ये एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोसायटीत बँडमिंटन खेळात असतांना एका मुलाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. मृत्यू झालेल्या मुलाचा नाव आकाश संतोष साहू आहे. या घटनेने साहू कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी (११ जुलै) संध्याकाळी सातच्या सुमारास आकाश आपल्या मित्रांसोबत सोसायटीच्या आवारात बॅडमिंटन खेळत होता. खेळादरम्यान शटल कॉक पहिल्या मजल्यावरून एका फ्लॅटजवळील खिडकीत गेला. तो शटल काढण्यासाठी आकाश वर गेला असता, तिथल्या खिडकीतून एसीच्या विद्युतप्रवाहाचा जोरदार शॉक लागून आकाश जागीच कोसळला आणि मृत झाला.
ज्यांच्या फ्लॅटमध्ये आकाश गेला होता तिथे राहणाऱ्या महिला ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर सोसायटीतील नागरिकांमध्ये संतापाचा भडका उडाला असून. अनेकांनी त्या महिलेविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही रहिवाश्यांनी तिला सोसायटीतून बाहेर करण्याची मागणी देखील केली आहे. घटनेचा संपूर्ण तपशील सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. एसीमधून बाहेर पडणारा विद्युतप्रवाह इतका तीव्र कसा झाला, याबाबत चौकशी केली जात आहे. मात्र या दुर्दैवी घटनेने परिसरात एकाच शोककळा पसरली आहे.
धक्कादायक ! पत्नीने पतीला फेकून मारलेले त्रिशूल चिमुकल्याच्या डोक्यात घुसले; तडफडून झाला मृत्यू