छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर दोन कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. यावेळी एकाने अचानक पिस्तूलमधून गोळीबार केला. या गोळीबारात एका कर्मचाऱ्याच्या थेट पोटात गोळी घुसली. गोळीबार झाल्यानंतर आरोपी हा फरार झाला. जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा वाद का झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.
‘नवराष्ट्र इम्पॅक्ट’! कुरुंदवाड पोलिसांची धडाडीची कारवाई; अवैध जुगार प्रकरणी पाच जणांवर थेट…
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर शुक्रवारी रात्री गोळीबाराची एक घटना समोर आली आहे.
टोलनाक्यावर दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला या वादात अचानक गोळीबार करण्यात आला. गोळीबारात एका कर्मचाऱ्याच्या थेट पोटात गोळी घुसली. आरोपीला तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव भारत घाटगे आहे.
प्राथमिक माहितीनुसार, भरात घाटगे आणि दुसरा कर्मचारी यांच्यात काही कारणावरून वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की त्यामध्ये हाणामारी झाली.
या हाणामारी दरम्यान दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून असलेल्या पिस्तूलमधून अचानक गोळी भरत घाटगे यांच्या दिशेने सुटली, आणि गोळी थेट त्यांच्या पोटात घुसली. गोळीबारानंतर आरोपी कर्मचारी घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
कर्मचाऱ्यांकडे पिस्तूल आले कुठून?
याप्रकरणी पोलिसांनी ‘समृद्धी’च्या अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना पिस्तूल देण्यात आले नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हे पिस्तूल दोन कर्मचाऱ्यांकडे कुठून आले, यासंदर्भात देखील चौकशी सुरू आहे.