Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार मध्ये विष पिऊन एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या, कारण आला समोर…; चिट्ठीत काय?

हरियाणातील एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला होता. मृतांमध्ये चार प्रौढ व्यक्ती आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचा कारण समोर आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 28, 2025 | 11:15 AM
hariyana (फोटो सौजन्य: social media)

hariyana (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

हरियाणातील पंचकुलातील एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतांमध्ये चार प्रौढ व्यक्ती आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. पंचकुला येथील सेक्टरमध्ये कार उभी करुन या सगळ्यांनी विष पियुन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

नागपूर हिंसाचारप्रकरणी मुख्य आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला; फहीम खानवर देशद्रोहाचा ठपका कायम

नैराश्याच्या गर्तेत आत्महत्या

मृतांमध्ये प्रवीण मित्तल, त्यांची पत्नी, आई-वडील आणि दोन मुली व एका मुलाचा समावेश आहे. प्रवीण मित्तल भंगाराचा व्यवसाय करायचे. काही काळापासून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा प्रचंड बोझा झाला होता. त्यामुळे ते नैराश्यात होते. याच कारणामुळे कुटुंबियांसह सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.प्रवीण मित्तल आणि त्यांचे कुटुंब सोमवारी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या सत्संगला गेले होते. तिथून परत येताना सगळ्यांना सामूहिक आत्महत्या केली. आपल्या मृत्यूनंतर मुलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनाही प्रवीण मित्तल यांनी विष दिल्याची माहिती समोर आली आहे.

चिट्ठीत काय?
तपासा दरम्यान पोलिसांना गाडीतून दोन पानी चिठ्ठी सापडली. त्याचा सगळं तपशील समोर आला आहे. प्रवीण मित्तल यांनी चिट्ठीत म्हटले होते की, हा सगळा माझा दोष आहे. यासाठी माझ्या सासू-सासऱ्यांना त्रास देऊ नये.

उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

पंचकुला सेक्टर 27 मध्ये मंगळवारी रात्री स्थानिकांच्या नजरेस एक कार आढळली. लोकांनी त्या कारच्या जवळ जाऊन पहिले तेव्हा गाडीत अनेक लोक बसले होते. ड्रॉयव्हरच्या सीटवर बसलेले प्रवीण मित्तल हे शुद्धीत होते. प्रवीण मित्तल यांनी लोकंना सांगितले की, आमच्यावर खूप कर्ज होते, त्यामुळे आम्हाला टोकाचा निर्णय घ्यावा लागला. त्यावेळी लोकांनी लगेच प्रवीण मित्तल यांच्यासह सगळ्यांना गाडीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी सहा जणांना मृत घोषित केले. तर प्रवीण मित्तल यांचा काहीवेळाने उपचारादरम्यान मृत्यू झाला.

भंगार व्यावसायिक, ऐषोरामी जीवन

प्रवीण मित्तल हे एक बडे भंगार व्यावसायिक होते. एकेकाळी मित्तल कुटुंबाने स्वत:चा कारखाना, गाडी, फ्लॅट अशाप्रकारचे ऐषोरामी जीवन जगले होते. हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे मित्तल यांचा भंगाराचा कारखाना होता. मात्र, कर्ज वसूल करण्यासाठी बँकेने हा कारखाना ताब्यात घेतला. त्यांच्या मागे कर्जवसुलीसाठी देणेकऱ्यांचा तगादा लागल्याने मित्तल कुटुंबीय हे पंचकूला येथील सकेत्री गावात राहायला गेले होते. प्रवीण मित्तल हे उदरनिर्वाहासाठी कॅब चालवत होते. त्यांच्यावर जवळपास 20 कोटी रुपयांचे कर्ज होते. बँकेने त्यांची सगळी मालमत्ता जप्त केली होती. त्यामुळे त्यांच्यावर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली होती. मात्र, कर्जाचा बोझा वाढल्याने त्यांचे जगणेही मुश्कील झाले होते.

Pune Crime : शिंदेंच्या शिवसेना जिल्हाध्यक्षाने पुतण्या- पुतणीवर रोखली बंदूक, नेमकं काय प्रकरण?

Web Title: Seven members of the same family committed suicide by drinking poison in the car the reason came to light what was in the letter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 11:15 AM

Topics:  

  • crime
  • Haryana Crime
  • Sucide News

संबंधित बातम्या

Madhya Pradesh Crime: माणुसकीला काळीमा! नवरात्रीत 8 वर्षांच्या चिमुकलीवर ‘काका’नेच केला बलात्कार, रक्ताचे डाग पाहून…
1

Madhya Pradesh Crime: माणुसकीला काळीमा! नवरात्रीत 8 वर्षांच्या चिमुकलीवर ‘काका’नेच केला बलात्कार, रक्ताचे डाग पाहून…

Uttarpradesh: ३९ कोटींच्या विम्यासाठी मुलाने रचला कट; आई-वडिलांना ठार करून दाखवला अपघात, पत्नीच्या मृत्यूनंतरही केले लाखोंचे दावे
2

Uttarpradesh: ३९ कोटींच्या विम्यासाठी मुलाने रचला कट; आई-वडिलांना ठार करून दाखवला अपघात, पत्नीच्या मृत्यूनंतरही केले लाखोंचे दावे

Karnatak Crime : लग्नाला दोन वर्षेही पूर्ण नाही आणि…, आधी पत्नीची हत्या नंतर गळफास घेत आत्महत्या
3

Karnatak Crime : लग्नाला दोन वर्षेही पूर्ण नाही आणि…, आधी पत्नीची हत्या नंतर गळफास घेत आत्महत्या

Chattisgarh Crime: गर्भपाताच्या वादातून अल्पवयीन प्रेयसीने लॉजमध्ये प्रियकराची केली हत्या; रायपूर येथील घटना
4

Chattisgarh Crime: गर्भपाताच्या वादातून अल्पवयीन प्रेयसीने लॉजमध्ये प्रियकराची केली हत्या; रायपूर येथील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.