शिवसेना शिंद गटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाअध्यक्षाने पुतण्या आणि पुतणीवर बंदूक रोखून धमकावल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालं आहे. आमदार विजय शिवतारे यांची भाची केतकी धनंजय झेंडे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. दिलीप यादव हे आमदार विजय शिवतारे यांचे चुलत मेहुणे आहेत. तर तर फिर्यादी केतकी धनंजय झेंडे या शिवतारे यांच्या सख्ख्या भाची आहेत.
नागपूर हिंसाचारप्रकरणी मुख्य आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला; फहीम खानवर देशद्रोहाचा ठपका कायम
नेमकं काय प्रकरण?
सासवड पोलीस स्टेशनमध्ये दाखल फिर्यादीनुसार, शनिवारी (२४ मे) सासवड- हडपसर रोडवरील महाराजा लॉन्समध्ये फिर्यादी झेंडे यांचे चुलत भावाचा साखरपुडा होता. या कार्यक्रमाला केतकी झेंडे या सहकुटुंब हजर होते. याच कार्यक्रमात विनय यादव, दिलीप यादव, सुनीता यादव, शुभांगी दौंडकर, अक्षता यादव, भुजंग यादव, महेश यादव हे देखील उपस्थित होते.
यावेळी फिर्यादी केतकी झेंडे यांचे चुलत भाऊ संकेत यादव हा झेंडे यांच्या परिवारातील सदस्यांना खिजविण्याच्या हेतूने जवळ आला. त्याने झेंडे यांच्या परिवारातील सदस्यांना ‘तुम्ही शनिवारी माझ्या लग्नाला दिलीप यादव यांचे कारण देऊन आला नाहीत. मग आज या साखरपुड्यात कार्यक्रमाला कसे काय आले?’ असा प्रश्न त्याने केला. यावरून झेंडे यांचे दोन्ही भाऊ आणि चुलत भाऊ यांची संकेत यादव याच्याशी किरकोळ बाचाबाची झाली. त्यावेळी संकेत यादव हा झेंडे कुटुंबियांपासून दूर निघून गेला. त्यांनतर संकेत यादव हा दिलीप यादव यांच्या कुंटुबीयांच्या घोळक्यात गेला. त्यानंतर काही मिनिटात दिलीप यादव, विनय यादव, सुनिता यादव, शुभांगी दौंडकर, अक्षता यादव, भुजंग यादव, महेश यादव आणि इतर काहीजण झेंडे यांच्या भावांच्या अंगावर धावून आले.
यातील अक्षता यादव, सुनिता यादव, शुभांगी दौंडकर यांनी दोन्ही भावांच्या अंगावर जाऊन त्यांना वळ येईपर्यंत मारहाण केली. तसेच या प्रसंगी केतकी धनंजय झेंडे मधे पडल्या असता दिलीप यादव आणि विनय यादव यांनी त्यांना जोरात ढकलून दिले. या ढकला ढकलीत झेंडे यांच्या गळ्यातील टेम्पल हार, अंदाजे 3.30 ग्रॅम वजनाचा हार गहाळ झाला.
याच दरम्यान दिलीप आणि विनय यादव यांनी कंबरेचं पिस्टल काढून झेंडे आणि त्यांच्या भावांच्या अंगावर ताणून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. पुन्हा सासवड मध्ये दिसलात तर बघा अशी धमकी दिलेली. तसेच या आधी देखील यादववाडी येथे झेंडे यांचे भाऊ प्रसाद यादव व सागर यादव गेले असता विनय व दिलिप यादव यांनी त्यांचेकडील पिस्टल ऊगारुन जिवे मारणेची धमकी दिलेली होती. त्यावेळी सासवड पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा देखल करण्यात आला होता.
आता, शनिवारी सासवड हडपसर रोडवरील महाराजा लॉन्समध्ये दिलीप सोपान यादव आणि केतकी धनंजय झंडे यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेल्या वादाची फिर्याद केतकी झेंडे यांनी दाखल केली. दिलीप यादव यांनीही तीन जणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती-घरांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना