Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: लिव्ह-इन अन् शेवटी विश्वासघात! लग्नाचे आमिष दाखवत तीन वर्षे संबंध, वारंवार केलेत अत्याचार

जयदत्त जगन्नाथ चोरगे (२४, रा. कोल्हे होड ता. गेवराई जि. बीड) असे पीडितेवर अत्याचार करुन लग्नास नकार देणाऱ्याचे नाव असुन त्याच्याविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 10, 2026 | 05:15 PM
लग्नाचे आमिष दाखवत तीन वर्षे संबंध, वारंवार केलेत अत्याचार (Photo Credit- AI)

लग्नाचे आमिष दाखवत तीन वर्षे संबंध, वारंवार केलेत अत्याचार (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • लिव्ह-इन अन् शेवटी विश्वासघात!
  • लग्नाचे आमिष दाखवत तीन वर्षे संबंध
  • वारंवार केलेत अत्याचार
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): लग्नाचे गोड आमिष दाखवत नीटची तयारी करणाऱ्या तरुणीसोबत प्रेमाच्याजाळ्यात ओढले. तुला सोडून जाणार नाही, तुझ्या सोबत राहिल असे सांगत तिच्यासोबत तीन वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहून वारंवार अत्याचार केला. अन शेवटी मेसेज पाठवत लग्नास नकार देत संबंध तोडले. ही घटना २८ जून २०२३ ते २ एप्रिल २०२६ दरम्यान शिवाजीनगरात घडली.

जयदत्त जगन्नाथ चोरगे (२४, रा. कोल्हे होड ता. गेवराई जि. बीड) असे पीडितेवर अत्याचार करुन लग्नास नकार देणाऱ्याचे नाव असुन त्याच्याविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडित तरुणी ही ती जालन्यातील रहिवासी असून, सध्या शिवाजीनगर परिसरात राहते. ती १२ वी सायन्स पास झालेली आहे. तिला डॉक्टर बनायचे असल्याने ती सध्या नीटच्या परिक्षेची तयारी करित आहे. जून २०२३ मध्ये तरुणीची जयदत्त चोरगे याच्याशी ओळख झाली. मोबाइलवरून सुरू झालेला संवाद काही दिवसांतच प्रेमात बदलला. जयदत्तने तिला खुलताबाद, वेरुळ येथे फिरायला नेले. त्यानंतर शिवाजीनगर परिसरातील एका हॉटेलवर नेऊन शारिरिक संबंध ठेवले.

डिसेंबर २०२३ पासून आरोपीने तरुणीसाठी शिवाजीनगरात राहण्याची व्यवस्था केली. पुढे मार्च २०२५ मध्ये आपण लग्न करणार आहोत, असे सांगत दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. विविध भाड्याच्या घरांमध्ये राहून या काळात आरोपीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले. लिव्ह-इनमध्ये राहत असतानाच आरोपी इतर मुलींशीही संपर्कात असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. याबाबत विचारणा केल्यावर आरोपीने मारहाण करत पुन्हा विचारलास तर हातपाय तोडतो, अशी धमकी दिली. तरीही लग्नाच्या आशेवर तरुणीने संबंध कायम ठेवले. फेब्रुवारी २०२६ मध्ये आरोपी पुण्यात गेला.

Akola Crime: मुलावर हल्ला, आई आडवी आली; पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

तेथून त्याने तरुणीला बोलावून एका लॉजवर नेले आणि पुन्हा लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले. नंतर मात्र तू मला आवडत नाही, म्हणत लग्नाला नकार दिला. तुला आधी समजत नव्हते का, असे विचारताच त्यांच्यात वाद झाला. पीडितेने पुण्याहून थेट छत्रपती संभाजीनगर गाठले. त्याला फोन केला तर फोन बंद असल्याने तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौटुंबिक प्रयत्नही फसले

दोन्ही कुटुंबीयांमध्ये लग्नाबाबत बैठक झाली होती. मात्र आरोपीच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला. तरीही आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले.

तिने सोने मोडून त्याला दिले होते ८० हजार

आरोपी जयदत्त जानेवारी २०२६ मध्ये एम. कॉम. प्रवेश घ्यायचा असल्याने त्याने पीडितेकडे पैशांची मागणी केली होती. त्यासाठी पीडितेने स्वतःचे सोने विक्री करुन ८० हजार रुपये आरोपीला दिल्याचे देखील फिर्यादीत नमुद आहे. एवढे केल्यानंतरही त्याने विश्वासघात केला.

Beed Crime: छळ थांबला नाही! शाळा बदलूनही पाठलाग; छेडछाडीमुळे दहावीच्या मुलीने संपवले जीवन

Web Title: Sexual relationship maintained for three years under the pretext of marriage repeated sexual assaults committed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • Live In Relation

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
3

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
4

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.