Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मैदानावर जाते’ म्हणत घराबाहेर पडली, काही तासांत शिक्षिकेचा मृतदेह सापडला; छ. संभाजीनगरात खळबळ

छत्रपती संभाजीनगरातील गोगाबाबा टेकडी परिसरात 27 वर्षीय शिक्षिका रेणुका गांगुर्डे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. टेकडीवर नागरिकांना तिचा मृतदेह आढळला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 17, 2026 | 01:43 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गोगाबाबा टेकडीवर 27 वर्षीय शिक्षिकेचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला.
  • मृत रेणुका गांगुर्डे या शहरातील शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
  • आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिस तपास सुरू आहे.
छत्रपति संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोगोबाबा टेकडी परिसरात एका २७ वर्षीय शिक्षिकेने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दुर्गम ठिकाणी मृतदेह असल्याने पोलीस कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालकाने सुमारे दोन किलोमीटरचा डोंगराळ मार्ग पार करून मृतदेह स्ट्रेचरवरून खाली आणला. आत्महत्या करणारी शिक्षिका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षिका बनली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव रेणुका शांताराम गांगुर्डे (वय २७) असे आहे. ती मूळची स्थानिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शिवारे येथील रहिवासी होती. उच्च शिक्षणासाठी ती तीन वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे आली होती. तिने एम.पी.एड.चे शिक्षण पूर्ण केले होते आणि शहरातील शारदा मंदिर कन्या प्रशालेत सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत होती.

रेणुकाचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत प्रतिकूल परिस्थिती जीवन जगत होते. तिचे आई- वडील आणि भाऊ गावात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होती. कठीण परिस्थितीवर मात करत तिने शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षिकेची नोकरी मिळवली होती. सोमवारी सायंकाळी सुमारे सहाच्या दरम्यान काही नागरिक गोगाबाबा टेकडीवर ट्रेकिंगसाठी गेले तेव्हा एका लिंबाच्या झाडाला तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच बेगमपुरा आणि छावणी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

Kalyan Crime: काहीतरी भलतंच! जमीन पत्नीच्या नावावर, नातेवाईकांनी केलं जगणं मुश्किल; राग अनावर होत नवऱ्याने केला बायकोचा खून

अत्यंत काळजीपूर्वक मृतदेह खाली आणला

डोंगराच्या उंच भागात घटनास्थळ असल्याने रुग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती. त्यामुळे रुग्णवाहिका पायथ्याशी उभी करून दोन किलोमीटरचा कठीण डोंगराळ मार्ग पायी पार करून मृतदेह स्ट्रेचरवर ठेवला आणि अत्यंत काळजीपूर्वक खाली आणला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा त्यांना पॅन कार्ड, शाळेचे ओळखपत्र आणि मोबाईल फोन मिळून आला. या कागदपत्रांच्या आधारे तिची ओळख निश्चित करण्यात आली. याची माहिती तिच्या कुटुंबियांना देण्यात आले. माहिती मिळताच नाशिकहून तिचे आई- वडील आणि नातेवाईक छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचले. घाटी रुग्णालयात त्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांना पाहून हेलावून गेला.

कुटुंबीयांची केली विचारपूस

घटनेच्या एका दिवस आधी रेणुकाने आपल्या लहान भावाला फोन करून आई- वडील आणि कुटुंबीयांची विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी दुपारी ती “मैदानावर सरावासाठी जात आहे,” असे सांगून राहत्या ठिकाणाहून बाहेर पडली होती. मात्र, त्यानंतर ती गोगाबाबा टेकडीवर गेली आणि तेथे लिंबाच्या झाडाला गळफास घेतले.

आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास करत आहे. अत्यंत संघर्षमय परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून रेणुका शिक्षिका बनली होती. या घटनेने कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bihar News : आगीच्या ज्वाळांनी वृद्धाला वेढले… पाहून पोलिसही हादरले, संतप्त जमावाने आयुक्तांना केली मारहाण

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव काय होते?

    Ans: रेणुका शांताराम गांगुर्डे असे तिचे नाव होते.

  • Que: रेणुका गांगुर्डे कोणत्या व्यवसायात होत्या?

    Ans: त्या छत्रपती संभाजीनगरातील शारदा मंदिर कन्या प्रशालेत सहाय्यक शिक्षिका होत्या.

  • Que: पोलिसांना घटनास्थळी काय आढळले?

    Ans: पोलिसांना तिची बॅग, पॅन कार्ड, शाळेचे ओळखपत्र आणि मोबाईल फोन आढळून आला.

Web Title: She left home saying she was going to the ground a teachers body was found within hoursshockwaves in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
3

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
4

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.