Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Child Abuse Case : पोटच्या मुलीचा छळ; हातापायांना सिगारेटचे चटके दिल्याचा आरोप, बापाला अटक

Child Abuse Case : मिसारवाडी परिसरात दहा वर्षीय मुलीचा तिच्या वडिलांनी छळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मुलीच्या हातापायांना सिगारेटचे चटके दिल्याचा, अंगावर थंड पाणी टाकल्याचा आणि डोक्याच्या मागील बाजूचे केस कापल्याचा आरोप आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 27, 2026 | 08:22 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • नराधम बापाला बेड्या ठोकल्या  
  • भावाला पाहताच ती रडू लागली  
  • मुलीच्या डोक्यावरील केसही कापले  
Child Abuse Case :  ज्या वडिलांकडून सुरक्षिततेची अपेक्षा असते, त्याच्याचकडून दहा वर्षीय मुलीचा छळ झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मिसारवाडी परिसरात राहणाऱ्या मुलीच्या अंगावर थंड पाणी टाकून तिच्या हातापायांना सिगारेटचे चटके दिल्याची तसेच डोक्याच्या मागील बाजूचे केस कापल्याची तक्रार तिच्या भावाने पोलिसांत दिली आहे. या तक्रारीवरून नराधम बापाविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नराधम बापाला बेड्या ठोकल्या

प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल होताच नराधम बापाला बेड्या ठोकल्या. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक सोपान नरळे यांनी दिली. या प्रकरणात १० वर्षीय पीडित मुलीच्या २४ वर्षीय भावाने फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी हे पत्नीसोबत राहून पेंटर काम करुन आपला – उर्दनिर्वाह करतात. तर त्याचे लहान भाऊ व १० – वर्षीय पीडित बहिण नराधम बापासोबत राहतात.

पुण्यात बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड; तब्बल ५ लाख ६४ हजारांच्या नोटांसह चौघांना अटक

भावाला पाहताच ती रडू लागली

२५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.१६ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या काकांनी फोन करून पीडित – मुलगी आणि वडील घरी दिसत नसल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने वडिलांच्या घरी – जाऊन पाहिले; मात्र दोघेही तेथे आढळले नाहीत, त्यामुळे त्याने दोघांचा शोध सुरू केला. दरम्यान, जहागीर कॉलनी, जटवाडा रोड परिसरात राहणाऱ्या मावस बहिणीचा फोन आला. तिने – पीडित मुलगी त्या परिसरात आल्याचे सांगितले. फिर्यादी तेथे पोहोचला असता पीडिता त्याला दिसली. भावाला पाहताच ती रडू लागली.

मुलीच्या डोक्यावरील केसही कापले

भावाने विश्वासात तिची चौकशी केली असता, २५ ऑक्टोबर रोजी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास घरी वडिलांनी अंगावरील कपडे जबरदस्तीने काढले, अंगावर थंड पाणी टाकले आणि हातापायांना सिगारेटचे चटके दिले, असे पीडितेने भावाला सांगितल्याचे फिर्यादीत नमुद आहे. तसेच डोक्याच्या मागील बाजूचे केस कापून विनयभंग केल्याचाही फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. मुलीने सांगितलेल्या प्रकारानंतर फिर्यादीने सिडको पोलिस ठाणे गाठुन दिलेल्या तक्रारीनंर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सोपान नरळे करित आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून मानव जातीला काळीमा पासणाऱ्या घटनेचा निषेध होत आहे.

चिठ्ठीतून अश्लील मागणी, मोटारसायकलला आग; पीडितेच्या छळ प्रकरणी पिंपरी न्यायालयाचा मोठा निकाल

Web Title: Misarwadi 10 year old girl torture case father arrested sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • Abuse of Minor Girls
  • Abused Case
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • Chhatrapati Sambhajinagar News

संबंधित बातम्या

Municipal Corporation Action : रंगारगल्लीत मालमत्ता मालकांच्या विरोधामुळे पाडकामाचा ढिगारा हटवण्याचे काम लांबणीवर
1

Municipal Corporation Action : रंगारगल्लीत मालमत्ता मालकांच्या विरोधामुळे पाडकामाचा ढिगारा हटवण्याचे काम लांबणीवर

Bunty Dixit Murder Case :  हत्या केल्यानंतर मैदानात कट्टा फेकला, स्वतःच गाठले पोलीस ठाणे; आरोपीची धक्कादायक माहिती
2

Bunty Dixit Murder Case : हत्या केल्यानंतर मैदानात कट्टा फेकला, स्वतःच गाठले पोलीस ठाणे; आरोपीची धक्कादायक माहिती

‘दहा लाख रुपये दे, नाहीतर गेम करेन’; थेट उपमहापौरांनाच मिळाली जीवे मारण्याची धमकी
3

‘दहा लाख रुपये दे, नाहीतर गेम करेन’; थेट उपमहापौरांनाच मिळाली जीवे मारण्याची धमकी

Pregnant Woman Abuse: “पैसे आणले नाहीतर दुसरे लग्न करू!” सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4

Pregnant Woman Abuse: “पैसे आणले नाहीतर दुसरे लग्न करू!” सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.