Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ही तर सियापेक्षा खतरनाक निघाली! पतीचा खून, बाथरूम मृतदेह पुरला अन् 45 दिवस बाजूलाच…; रुबीच्या गुन्ह्याचा धक्कादायक पर्दाफाश

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे 45 दिवस बेपत्ता असलेल्या सुरेंद्र शर्मा यांचा मृतदेह त्यांच्या घरातील बाथरूमच्या फरशीखाली पुरलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणात पत्नी रुबीला अटक करण्यात आली असून, तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 04, 2026 | 02:14 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 45 दिवस बेपत्ता असलेल्या सुरेंद्र शर्मा यांचा मृतदेह घरातील बाथरूमच्या फरशीखालून सापडला.
  • पत्नी रुबीला अटक करण्यात आली असून, तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.
  • हत्येनंतर मृतदेह पुरून वर प्लास्टर करण्यात आल्याचा संशय असून, इतर आरोपींचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे.
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक थरारक हत्याकांड समोर आली आहे. तब्ब्ल 45 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पतीचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय आणि पोलीस रात्रंदिवस प्रयत्न करत होते. पत्नी मात्र वारंवार, “तो परत येईल,” असंच सांगत होती. पण पोलिसांची नजर घरातील बाथरूममधील एका ताज्या प्लास्टरवर गेली आणि त्यानंतर उघड झालेलं सत्य पाहून पोलिसांसह संपूर्ण परिसर हादरून गेला. आग्र्यातील सिंकदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्राची टॉवर चौकी परिसरातील रेणुका धाम कॉलोनीतील ही धक्कादायक घटना आहे.

काय नेमकं प्रकरण?

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सुरेंद्र कुमार शर्मा (४४) असे आहे. सुरेंद्र कुमार शर्मा हा १८ मेपासून बेपत्ता होता. त्याला शोधण्यासाठी त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक दिवस रात्र एक करत होते. यावेळी त्याची पत्नी रुबी एकच सांगत होती. माझा नवरा कुठे तरी गेलाय. तो परत येईल, असं ती वारंवार सांगत होती. त्यांनतर तिने २६ मे रोजी सुरेंद्र हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा त्यांना अनेक गोष्टी संशयापसाद वाटल्या.

बाथरूममध्ये खोदकाम आणि…

३ जुलै शुक्रवारी पोलीस पुन्हा एकदा सुरेंद्रच्या घरी गेले. तेव्हा रुबीचं वागणं पोलिसांना संशयास्पद वाटलं. याचवेळी सुरेंद्रचा भाऊ अनिल शर्मानेही पोलिसांना काही महत्त्वाची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी सुरेंद्रच्या घराचा तपास करण्याचा निर्णय घेतला. तपास करत असतांना पोलिसांची नजर बाथरूममधील लादीकडे गेली. बाथरूममध्ये ताजं प्लास्टर केल्याचं लक्षात आलं. तेव्हा पोलिसांनी बाथरूममध्ये खोदकाम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सुरेंद्रची डेडबॉडी सापडली.

Ketan Agrawal Murder Case: ‘जे लग्न होणार नाही…’; सियाच्या कथित चॅटमधून धक्कादायक प्लॅनिंगचा खुलासा!

पोलिसांनी रुबीला केली अटक

बॉडी सापडताच पोलिसांनी रुबीला तव्यात घेतलं. तिची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा तिने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. हत्येच्या आधीच बाथरूमचं काम करण्यासाठी मिस्त्री आणि मजदूर बोलावण्यात आले होते, असं रुबीने पोलिसांना सांगितलंय.

कशी केली हत्या?

या हत्येच्या दिवशी रूबीने अत्यंत थंड डोक्याने कट रचला होता. तिने आधी दोन्ही मुलींना सुरेंद्र यांच्या मोठ्या भावाच्या घरी पाठवून दिले. त्यानंतर घरात कोणी नसताना तिने सुरेंद्र यांना रात्री खिरीमध्ये गुंगीच्या गोळ्या मिसळून दिल्या. सुरेंद्र बेशुद्ध पडल्यानंतर तिने त्यांचा गळा आवळून जीव घेतला. हत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रूबीने बाथरूममध्ये एक मोठा खड्डा खणला. धक्कादायक बाब म्हणजे, तिने या कामासाठी आधीच मिस्त्री आणि मजूर बोलावून पूर्वतयारी केली होती. तिने सुरेंद्र यांचा मृतदेह त्या खड्ड्यात गाडला आणि मिस्त्रीकडून वरून पुन्हा सिमेंट टाकून नव्या फरश्या बसवून बाथरूम तयार करून घेतलं, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. यानंतर नातेवाईक किंवा शेजाऱ्यांनी विचारल्यास, “ते कुठेतरी निघून गेले आहेत, लवकरच परत येतील” असे सांगत ती नाटक करत राहिली.

सुरेंद्रच्या भावाने काय सांगितलं?

सुरेंद्रला दारूची लत होती. त्यामुळे दोघा पती पत्नीत वारंवार भांडणं व्हायची. सुरेंद्र गायब झाल्यानंतर रुबीनेच फोन करून आम्हाला बोलावून घेतलं. त्यानंतर तो गायब झाल्याची तक्रार केली गेली. आमचं सर्व कुटुंब सुरेंद्रचा शोध घेत होतं. पण काहीच सुगावा लागला नाही, असं सुरेंद्रचा भाऊ अनिल शर्माने सांगितलं.

तपास सुरु

या हत्येच्या कटात रूबीसोबत इतर कोणी सामील होते का? तसेच ज्या मिस्त्री आणि मजुरांना बोलावले होते, त्यांना फक्त दुरुस्तीचे काम सांगण्यात आले होते की त्यांनाही या कटाची माहिती होती? पोलीस सध्या फॉरेन्सिक टीमच्या मदतीने, शवविच्छेदन अहवाल आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे या सर्व प्रश्नांचा सखोल तपास करत आहेत. आरोपी रूबी शर्मा सध्या पोलीस कोठडीत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Ketan Agrawal Muder : केतनच्या हत्येच्या कटाची माहिती चेतनच्या मित्राला? पोलिसांकडून कसून चौकशी सुरू

💡

Frequently Asked Questions

  • Que: आग्रा येथील या प्रकरणात नेमकं काय घडलं?

    Ans: 45 दिवस बेपत्ता असलेल्या सुरेंद्र शर्मा यांचा मृतदेह त्यांच्या घरातील बाथरूमच्या फरशीखाली पुरलेल्या अवस्थेत आढळला.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी कोणाला अटक केली आहे?

    Ans: सुरेंद्र शर्मा यांच्या पत्नी रुबीला अटक करण्यात आली असून, तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.

  • Que: पोलिसांचा पुढील तपास कोणत्या दिशेने सुरू आहे?

    Ans: हत्येत केवळ रुबीच सहभागी होती की आणखी कोणाचा सहभाग होता, तसेच गुन्ह्याची संपूर्ण योजना कशी आखण्यात आली याचा पोलीस तपास करत आहेत.

Web Title: She turned out to be even more dangerous than siya murdered her husband buried the body in the bathroom and lived right next to it for 45 days shocking details of rubys crime revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.