CRIME (फोटो सौजन्य : SOCIAL MEDIA)
मुंबईच्या डोंबिवली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीच्या ठाकुर्ली चोळेगाव परिसरात माहेरी आलेल्या एका विवाहित महिलेने गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. तिला १४ महिन्याचं बाळही आहे. हा प्रकार रविवारी रात्री घडला आहे. आपल्या मुलाला एकटं टाकून विवाहित महिलेने हे टोकाचं पाऊल उचलल्याने आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ज्योती विनोदकुमार चौहान (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. रामनगर पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
पोलीस अधिक्षकाच्या घरातच गांजाचा दर्प, बीडमधील घरात धक्कादायक प्रकार…नक्की काय प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती विनोदकुमार चौहान (वय 30) ही ठाकुर्लीतील चोळेगावातील तिच्या माहेरी आली होती. अविनाश निवास येथे वास्तव्य होतं. ज्योती ही मैत्रिणीच्या लग्न कार्यासाठी बंगळुरू येथून ठाकुर्लीत आली होती. ज्योतीचं सुमारे 8 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि तिला साधारण 14 महिन्यांचं बाळंही आहे. त्यात बाळासोबत ती माहेरी आली होती.
रविवारी 4 मे रोजी तिने माहेरी घरातच सिलिंगच्या हुकला दोरी बांधून स्वत:ला गळफास लावून घेतला आणि आयुष्य संपवलं. या घटनेची माहिती मिळताच कुटुंब शोकाकुल झाले. ज्योतीने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. रामनगर पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
कल्याणमध्ये ॲम्बुलन्ससाठी 1000 रुपये नसल्याने महिलेचा मृत्यू
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. केवळ 1000 रुपयांची रक्कम नसल्यामुळे रुग्णवाहिका नाकारण्यात आल्याने एका 35 वर्षीय महिलेला वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि तिचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे तिच्या दोन चिमुकल्या मुलांचे जीवन अंधारात गेले आहे. मृत महिलेचा नाव सविता बिराजदार (वय 35), कोळसेवाडी, कल्याण पूर्व येथील रहिवासी आहे.
कल्याणमध्ये ॲम्बुलन्ससाठी 1000 रुपये नसल्याने महिलेचा मृत्यू; दोन लहान मुले अनाथ