beed (फोटो सौजन्य : social media)
मागील काही महिन्यांपासून बीड जिल्ह्याची चर्चा जिकडे तिकडे होत आहे. बीडमधून अनेक गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाने बीड जिल्हा हादरला आहे. अश्यातच आता बीड जिल्हा पोलीस दलातून आणखीन एक खळबळजनक आणि धक्कादायक बाब समोर येत आहे. यात पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थान परिसरात पोलीस कर्मचारी चक्क गांजा ओढत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे कृत्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारत थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी केली आहे.
आत पाऊल ठेवताच गांजाचा दर्प…
पुढे आलेल्या माहिती नुसार, पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाचे डागडुजीचे काम सध्या सुरू आहे. याचीच पाहणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक कुटुंबासमवेत येथे गेले होते. मात्र यावेळी निलंबन करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गेट उघडलं नाही. काही वेळानंतर गेट उघडण्यात आलं आणि पोलीस अधीक्षकांनी आत प्रवेश केला. प्रवेश करताच त्यांना गांजाचा वास आला. त्यामुळे या पोलीस कर्मचार्याची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. तपासणी अहवालात कर्मचाऱ्याने गांजा पिल्याच निष्पन्न झालं. याची गंभीर दाखल घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबन करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव बाळू गहीनाथ बहिरवाळ आहे.
दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; सावत्र भावानेच केलं अश्लील कृत्य
पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. धनकवडी आणि कोंढवा या भागातून या घटना उघडकीस आल्या आहेत. धनकवडीत एका तरूणाने नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य करून तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. मुलीच्या आईला ही गोष्ट समजल्यानंतर मुलीच्या आईच्या तक्रारीवरून धनकवडीतील २१ वर्षीय तरूणाविरोधात पोस्को अंतर्गत सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पुणे हादरलं! दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; सावत्र भावानेच केलं अश्लील कृत्य