Shikrapur Crime: लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार अन्...; शिक्रापूरमधून समोर आली हृदयद्रावक घटना
शिक्रापूर: शिरुर येहील युवतीची ओळख अजय साळुंखे याच्या सोबत ओळख झाल्यानंतर अजयने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. मात्र युवतीशी लग्न न करता गुपचूप दुसऱ्या युवतीशी लग्न केले. त्यांनतर पिडीत युवतीने त्याच्याशी भांडण करत पोलिसांत तक्रार देते असे म्हटल्यानंतर अजय याने युवतीला रांजणगाव गणपती येथे भेटायला बोलावले.
त्यानंतर त्याने युवतीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत पुन्हा युवतीला कोरेगाव भीमा येथील मित्राच्या रूमवर घेऊन जाऊन युवतीवर बलात्कार केला. याबाबत पिडीत युवतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अजय कैलास साळुंखे रा. कोपरगाव ता. अहिल्यानगर जि. अहिल्यानगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील महिला तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले करत आहेत.
डिझेल चोरणाऱ्या टोळीला अटक
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार रात्रीच्या सुमारास वाहनांतील डिझेल चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान या डिझेल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सुनील रामचंद्र दुबे, ओंकार शिवाजी घाडगे, सुभाष दगडू मालपोटे, संदीप तुळशीराम वाघमारे, कुणाल सोमनाथ पवार व गणेश भाऊसाहेब मूरकुटे या सहा जणांना अटक करत डिझेल तसेच दोन कार जप्त केल्या आहेत.
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार रात्रीच्या सुमारास वाहनांतील डिझेल चोरीच्या घटना घडत होत्या. मात्र नुकतेच एका ट्रक चालकाला मारहाण दगडफेक करुन डिझेल चोरीची घटना घडलेली होती. दरम्यान शिक्रापूर पोलीस सर्व डिझेल चोरीचा तपास करत असताना एका नंबर नसलेल्या स्विफ्ट कार मधून युवक चोरी करत असल्याचे समोर आले. त्यांनतर कोरेगाव भीमा परिसरात नंबर नसलेली एक स्विफ्ट कार संशयितपणे फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली.
Shikrapur Crime: शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई; डिझेल चोरणाऱ्या टोळीला अटक; कोर्टाने थेट…
दरम्यान त्यांनी डिझेल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांनतर पोलिसांना डिझेल विकत घेणाऱ्या तिघांसह अजून एक आय २० कार जप्त केली. सदर गुन्ह्यात पोलिसांनी सुनील रामचंद्र दुबे वय ३५ वर्षे व ओंकार शिवाजी घाडगे वय २२ वर्षे दोघे रा. काळेपडळ हडपसर पुणे, सुभाष दगडू मालपोटे वय ४३ रा. कातरखडक ता. मुळशी जि. पुणे, संदीप तुळशीराम वाघमारे वय २३ वर्षे रा. खांबोली ता. मुळशी जि. पुणे, कुणाल सोमनाथ पवार वय २७ वर्षे रा. माळवाडी ता. हडपसर जि. पुणे, गणेश भाऊसाहेब मूरकुटे वय ४६ वर्षे रा. शिरसवडी ता. हवेली जि. पुणे या सहा जणांना अटक केली. या आरोपीनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तब्बल पाच ठिकाणी डिझेल चोरी केल्याची कबुली दिली. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहे.