डिझेल चोरणाऱ्या टोळीला अटक (फोटो- टीम नवराष्ट्र)
शिक्रापूर: शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार रात्रीच्या सुमारास वाहनांतील डिझेल चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान या डिझेल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सुनील रामचंद्र दुबे, ओंकार शिवाजी घाडगे, सुभाष दगडू मालपोटे, संदीप तुळशीराम वाघमारे, कुणाल सोमनाथ पवार व गणेश भाऊसाहेब मूरकुटे या सहा जणांना अटक करत डिझेल तसेच दोन कार जप्त केल्या आहेत.
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार रात्रीच्या सुमारास वाहनांतील डिझेल चोरीच्या घटना घडत होत्या. मात्र नुकतेच एका ट्रक चालकाला मारहाण दगडफेक करुन डिझेल चोरीची घटना घडलेली होती. दरम्यान शिक्रापूर पोलीस सर्व डिझेल चोरीचा तपास करत असताना एका नंबर नसलेल्या स्विफ्ट कार मधून युवक चोरी करत असल्याचे समोर आले. त्यांनतर कोरेगाव भीमा परिसरात नंबर नसलेली एक स्विफ्ट कार संशयितपणे फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली.
त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लहानू बांगर, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, रोहिदास पारखे, अमोल दांगडे, शिवाजी चीतारे, विकास पाटील, नारायण वाळके, जयराज देवकर यांनी कोरेगाव भीमा येथे जाऊन सदर कारसह युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या कार मधील तिघा युवकांजवळ डिझेलचे ड्रम, पाईप असे साहित्य मिळून आले.
दरम्यान त्यांनी डिझेल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांनतर पोलिसांना डिझेल विकत घेणाऱ्या तिघांसह अजून एक आय २० कार जप्त केली. सदर गुन्ह्यात पोलिसांनी सुनील रामचंद्र दुबे वय ३५ वर्षे व ओंकार शिवाजी घाडगे वय २२ वर्षे दोघे रा. काळेपडळ हडपसर पुणे, सुभाष दगडू मालपोटे वय ४३ रा. कातरखडक ता. मुळशी जि. पुणे, संदीप तुळशीराम वाघमारे वय २३ वर्षे रा. खांबोली ता. मुळशी जि. पुणे, कुणाल सोमनाथ पवार वय २७ वर्षे रा. माळवाडी ता. हडपसर जि. पुणे, गणेश भाऊसाहेब मूरकुटे वय ४६ वर्षे रा. शिरसवडी ता. हवेली जि. पुणे या सहा जणांना अटक केली. या आरोपीनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तब्बल पाच ठिकाणी डिझेल चोरी केल्याची कबुली दिली. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहे.
अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांना पन्नास हजारांचा दंड
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक महाविद्यालय परिसरात अल्पवयीन मुले दुचाक्या घेऊन स्टंट करणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे असे प्रकार होत असल्याचे समोर आले. त्यावर शिक्रापूर पोलिसांनी सदर महाविद्यालय परिसरात दुचाक्या घेऊन येणाऱ्या पालकांना दणका देत पंचवीस वाहन चालकांकडून पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
Shikrapur Crime: शिक्रापूर पोलिसांचा दणका; अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांना पन्नास हजारांचा दंड
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, विकास सरोदे, अमोल दांडगे, विकास पाटील, हनुमंत गिरमकर, महिला पोलीस हवलदार उज्वला गायकवाड, किरण निकम यांनी साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय तळेगाव ढमढेरे समोर कारवाई मोहीम राबवत अल्पवयीन दुचाकी चालकांच्या दुचाक्या ताब्यात घेतल्या. तसेच तब्बल पंचवीस दुचाक्या ताब्यात घेऊन पंचवीस वाहन चालकांकडून रोख स्वरुपात पन्नास हजार रुपये दंड वसूल करुन पंधरा हजार रुपयांचा दंड वाहनांवर ऑनलाईन पद्धतीने दंड लावण्यात आला आहे.