Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार! रिक्षा चालकाने धावत्या बसला अडवलं आणि नग्न होऊन….

नाशिकमध्ये एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका रिक्षा चालकाने धावत्या बसला रिक्षा आडवी घालत नग्न होऊन महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली असून तो शहरातून तडीपार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 13, 2025 | 02:29 PM
rickshaw (फोटो सौजन्य- pinterest)

rickshaw (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

नाशिकमध्ये एक संतापजनक बातमी समोर येत आहे. एका रिक्षा चालकाने भररस्त्यात नग्न होत अश्लील हावभाव करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. संशयित रिक्षाचालक मिजान रजा ऊर्फ मल्ला सादिक शेख याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो शहरातून तडीपार असल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर हादरलं: आयपीएस अधिकाऱ्यावर महिला डॉक्टरने केला बलात्काराचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिटीलिंकची बस बोधले नगर परिसरातून येतांना अचानक बंद पडली. यामुळे बसमधील प्रवासी दुसऱ्या बसची वाट पाहत खाली उतरले. त्यावेळी एक रिक्षाचालक प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी विचारणा करण्यासाठी आला होता. त्याने एका महिलेला विचारले की, तुमको किधर जाना है, यावेळी महिलेने रिक्षा चालकाला नकार दिला. यानंतर महिला बसची वाट बघत असता संशयिताने तुमको किधर जाना है, असे म्हणत हाताने अश्लील इशारे केले.

रिक्षाचालक कपडे काढून नग्न झाला आणि…
यानंतर महिला घाबरून गेली होती. काही वेळाने सिटीलिंकची बस तेथे आल्याने प्रवासी बसमध्ये बसले. बस द्वारकेच्या दिशेने निघाली असता रिक्षाचालक तिचा पाठलाग करत आहे, असे महिलेला जाणवले. द्वारका सर्कल येथे सिटीलिंक बस आली असता रिक्षाचालक आणि त्याच्या मित्राने रिक्षा बसला आडवी लावली. यानंतर रिक्षाचालकाने कपडे काढून तो नग्न झाला. त्याने सिटीलिंक बस चालक आणि वाहकाला देखील मारहाण केली. तसेच बसवर दगड फेकत बसच्या काचादेखील फोडल्या. यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी पोलिसांना फोन केला.

आरोपी तडीपार
काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संशयित आरोपींना ताब्यात घेतले. संशयित रिक्षाचालक मिजान रजा ऊर्फ मल्ला सादिक शेख हा भद्रकाली, जुने नाशिक या परिसरात राहणारा आहे. यापूर्वी त्याच्यावर एक दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. 16 ऑगस्ट रोजी दंगलीतील तो आरोपी आहे. त्याला शहरातून तडीपार करण्यात आलेले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच संशयित आरोपीकडे असलेली रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे.

Web Title: Shocking incident in nashik rickshaw driver stopped a running bus and stripped naked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • Bus Stop
  • Nashik
  • rickshaw driver

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana : धक्कादायक! ‘लाडक्या बहिणीं’चे संकेतस्थळ बंद, ग्रामीण भागात अडचणी
1

Ladki Bahin Yojana : धक्कादायक! ‘लाडक्या बहिणीं’चे संकेतस्थळ बंद, ग्रामीण भागात अडचणी

Nashik News: कॉलेज तरुणी आणि 9 वर्षीय मुलगा बेपत्ता; एकाच दिवशी दोन वेगळ्या भागात घडली घटना; पालकांमध्ये भीतीचे वातावरण
2

Nashik News: कॉलेज तरुणी आणि 9 वर्षीय मुलगा बेपत्ता; एकाच दिवशी दोन वेगळ्या भागात घडली घटना; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

Nashik Municipal Election : शिवसेनेकडून १०१ उमेदवार रिंगणात; मनपा निवडणुकीत जुन्या-नव्यांचा मेळ साधत जिंकण्याची रणनीती
3

Nashik Municipal Election : शिवसेनेकडून १०१ उमेदवार रिंगणात; मनपा निवडणुकीत जुन्या-नव्यांचा मेळ साधत जिंकण्याची रणनीती

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद
4

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.