ips (फोटो सौजन्य- pinterest)
नागपूरच्या शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात नागपुरातील एका आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका महिला डॉक्टरने हा आरोप केला आहे.
नेमकं काय प्रकार?
नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये एका महिला डॉक्टरने तीस वर्षीय आयपीएस अधिकाराच्या विरोधात बलात्काराची तक्रार दिली. या तक्रारी नंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. पोलिसांकडून मिळलेल्या माहिती नुसार आयपीएस अधिकारी आणि महिला डॉक्टरची ओळख 2022 मध्ये पहिल्यांदा झाली. इंस्टाग्रामच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली होती. तरुण तेव्हा सिव्हिल सर्विसेसची तयारी करत होता. तर पीडित महिला डॉक्टर नागपुरात एमबीबीएसचे शिक्षण घेत होती.
आयपीएस अधिकारी झाला आणि…
इंस्टाग्रामवरील ओळखीनंतर दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि भेटीगाठी वाढल्या. याचदरम्यान लग्नाचे आश्वासन देऊन तरुणाने वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप या महिला डॉक्टरने तिच्या तक्रारीत केला आहे. यानंतर मात्र तरुण सिविल सर्विसेसची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी झाला आणि त्याने लग्नास नकार दिला. अनेक वेळेला प्रयत्न करूनही संबंधित आयपीएस अधिकारी भेटत नाही, त्याचे कुटुंबीय ही दाद देत नाही, यामुळे निराश झालेल्या महिला डॉक्टरने नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये आयपीएस अधिकाराच्या विरोधात बलात्काराची तक्रार दिली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरात नाही तर दुसऱ्या जिल्ह्यात
दरम्यान, ज्या आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तो नागपुरात पोस्टेड नाही. तर ते महाराष्ट्राच्या दुसऱ्या जिल्ह्यात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेने पोलीस विश्वात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहे.
आरोपी विशाल गवळीने संपवलं आयुष्य…
कल्याणमध्ये डिसेंबर 2024 मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. पण शनिवारी (13 एप्रिल) त्याने तुरूंगातच गळफास घेत आत्महत्या केली. विशाल गवळीच्या आत्महत्येनंतर गवळीचे वकील संजय धनके याने तरूंग प्रशासनावरच गंभीर आरोप केले आहेत. विशाल गवळीने आत्महत्या केली नसावी, त्याला मारले गेले असावे, विशाल गवळीचीही अक्षय शिंदेप्रमाणे हत्या केली गेली, असा आरोप संजय धनके यांनी केला आहे. संपूर्ण माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा…
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण; आरोपी विशाल गवळीने संपवलं आयुष्य