Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Farmers Distressed : येवल्यात कोबी उत्पादकांना दुष्काळाची झळ! कोबी कवडीमोल भावाने,शेतकरी व्यथित

Nashik Farmers Distressed : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नागडे शिवारातील शेतकरी दुष्काळ आणि कोबीच्या घसरलेल्या बाजारभावामुळे दुहेरी संकटात सापडले आहेत. कोबीला अवघा 2 रुपये किलो भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 03, 2026 | 10:27 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांच्या पदरी आता पुन्हा निराशा 
  • राज्यात दुष्काळाची परिस्थिती 
  • शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणे गरजेचे 
 

Nashik Farmers Distressed : नाशिक येथिल येवला तालुक्यातील नागडे शिवारात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळ परिस्थितीचा सामना येवला तालुक्यातील नागडे शिवारातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या क्षेत्रात कोबीचे पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना बाजार भावात मोठा धक्का बसला आहे. कोबीला बाजारात 02 किलो रुपये बाजार भाव मिळत असल्याने शेतकरी आता हतबल झाले आहेत.

तसेच 02 रुपये किलोने बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांचा या मधून खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकऱ्यांवर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.  या मुळे शेतकऱ्यांनी अखेर उभ्या कोबीच्या पिकात मेंढ्या चारण्यासाठी सोडल्याने त्याच्या पिकांवर रोटावेटर फिरवला गेला आहे.

शेतकऱ्यांच्या पदरी आता पुन्हा निराशा

शेतकऱ्यांना  दुष्काळामुळे आधीच पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि स्वखर्चातून शेतात कोबीच्या पीकाची लागवड केली. पण बाजारात शेतकऱ्यांना अपेक्षित भाव नमिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी आता पुन्हा निराशा पाहयायला मिळत आहे. 02 रुपये किलो दराने कोबी विकण्यापेक्षा आम्ही ही कोबी जनावरांना चारा म्हणून देत आहोत असे शेतकरी म्हणाले.सध्या राज्यात दुष्काळाच्या संकट असल्याने शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. एकीकडे पाण्याचे संकट आणि दुसरीकडे बाजारभावाची पडझड होत आहे. या दुष्काळामुळे आणि योग्य बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आता मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

Palghar Drought Relief Controversy : पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? आदिवासी शेतकरी मदतीपासून वंचित

राज्यात दुष्काळाची परिस्थिती

सध्या राज्यात दुष्काळाची परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. त्याच बरोबर कोसळलेले बाजारभाव यामुळे शेतकरी बांधव अत्यंत गंभीर आणि दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे पाणी नसल्याने पिके जगवणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे कष्टाने पिकवलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे.
या अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काही उपाय आणि पर्यायांचा करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणे गरजेचे

शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कारण मध्यस्थांची साखळी मोडून काढण्यासाठी शेतकरी आठवडी बाजार, गृहनिर्माण सोसायट्या किंवा शेतकरी आपला माल थेट शहरांमध्ये जाऊन विकू शकतो. यामुळे ग्राहकांना ताजा माल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव देखिल मिळेल. शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs) परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी सामूहिक विक्री केल्यास वाहतूक खर्च वाचेल आणि बाजारात व्यापाऱ्यांशी दराबाबत सौदा करण्याची ताकद वाढेल

भाजीपाला नाशवंत असल्याने बाजारात भाव नसताना तो फेकून देण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करणे फायदेशीर असते. पाण्याचे संकट पाहता पारंपारिक पद्धतीने पाणी न देता ठिबक (Drip) किंवा तुषार (Sprinkler) सिंचनाचा वापर करावा. दुष्काळग्रस्त भागासाठी सरकारकडून मिळणारे अनुदान, पीक विमा (Crop Insurance) आणि वीज बिलातील सवलती याबाबात स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधून माहिती शेतकऱ्यांना द्यावी.

Farmers Are Distressed : पाण्याअभावी नाचनवेल-पिशोर परिसरातील पिके सुकली; बळीराजा चिंतातूर आणि आक्रोश

Web Title: Nashik farmers distressed yeola cabbage price rs 2 per kg sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 10:27 PM

Topics:  

  • Farmer Crisis
  • Nashik
  • Nashik Latest News

संबंधित बातम्या

Farmers Are Distressed : पाण्याअभावी नाचनवेल-पिशोर परिसरातील पिके सुकली; बळीराजा चिंतातूर आणि आक्रोश
1

Farmers Are Distressed : पाण्याअभावी नाचनवेल-पिशोर परिसरातील पिके सुकली; बळीराजा चिंतातूर आणि आक्रोश

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे
2

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे

Farmmers Impact On Kharif Crops : शेतकऱ्यांच्या उत्पादनावर घट, खरीप पिकांवर मोठा परिणाम…..
3

Farmmers Impact On Kharif Crops : शेतकऱ्यांच्या उत्पादनावर घट, खरीप पिकांवर मोठा परिणाम…..

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला
4

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.