
अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम
Malegaon Temperature: अश्विन महिन्यातच मालेगाव शहर व तालुक्यात चैत्रातील उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने तापमानात सातत्याने वाढ होत असून, रविवारी (दि. ४) कमाल तापमान ३८.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्यामुळे ‘अश्विनात चैत्राचा दणका’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून, उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. (Malegaon Temperature)
गेल्या आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. २८ सप्टेंबरला कमाल तापमान ३७.२, तर १ आणि २ ऑक्टोबरलाही ३७.२ अंशांची नोंद झाली. रविवारी त्यात आणखी वाढ होऊन पारा ३८.२ अंशांवर गेला. पावसाने विश्रांती घेतल्याने खरीप पिकांच्या वाढीबाबत शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे. दरम्यान, शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामामुळे रस्ते खोदण्यात आले आहेत.
IND vs SL: गॉलमध्ये पाऊस फिरवणार सामन्यावर ‘पाणी’, वाढवली भारतीय संघाची चिंता
रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. वाहन गेल्यानंतर उठणाऱ्या धुळीच्या लोटांमुळे पादचारी, दुचाकीस्वार आणि स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे दुचाकीस्वारांना समोरील रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. डोळ्यांत धूळ गेल्याने जळजळ, खाज, पाणी येणे आणि अॅलर्जीच्या तक्रारीही वाढत आहेत. खोदकाम झालेल्या रस्त्यांवर नियमित पाण्याची फवारणी करावी, साचलेली माती हटवावी आणि काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांचे तातडीने पक्कीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अल निनोच्या प्रभावामुळे यंदा ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका वाढला असून, अश्विन महिन्यात चैत्रासारखी उष्णता जाणवू लागली आहे. रविवार (दि. ४) शहरात कमाल ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, मालेगावचे तापमानही ३५ अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मान्सूनने माधार घेतल्याने हवेतील आर्द्रता कमी झाली असून आकाश निरभ्र राहिल्याने सूर्यकिरणांचा बेट परिणाम जमिनीवर होत आहे. परिणामी तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबरमध्ये तापमानात सुमारे ३.५ ते ४ अशांची वाढ झाल्याचे चित्र आहे. सामान्यतः ऑक्टोबरमध्ये कमाल तापमान ३१ ते ३३ अंशांदरम्यान असते, गतवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्धात तापमान २८.४ ते २९-३ अंशांदरम्यान होते. यंदा मात्र सुरुवातीपासूनच उकाड्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.
Weather Forecast: पिंपरी-चिंचवडसह मावळ पट्ट्यात जीवघेणा दमटपणा; उकाड्याने पिंपरीकर त्रस्त